सालं अतीच झालं !या खेमराज भोयर या कवितासंग्रहाला पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर

सालं अतीच झालं !या खेमराज भोयर या कवितासंग्रहाला पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार जाहीर






वरोरा (प्रती )भिसी येथील सुप्रसिद्ध विद्रोही कवि/गितकार  खेमराज भोयर यांच्या"साल अतीच झालं!"या कवितासंग्रहाला  यावर्षीचा पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार. जाहीर करण्यात आला.खेमराज भोयर यांचा हा पहिलाच कवितासंग्रह पुण्याच्या परिस प्रकाशनाने काढला असुन, प्रकाशनाच्या अवघ्या तिन महिन्यात पहिली आवृत्ती संपली आहे.
       नुकताच त्यांना पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर झाला आहे, तर या आधी त्यांना त्यांच्या साहित्य प्रवासाठी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाने माता रमाई साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खेमराज भोयर यांची चळवळीची गाणी महाराष्ट्रातील  नामवंत गायक  संभाजी भगत ,शितळ माळी अनिरुद्ध वनकर राहुल शिंदे ,मनोजराजा गोस्वामी हे गित आजही गातात,तसेच" मक्याची कमाल,गोधळीत धमाल"या मराठी चित्रपटाची गाणी त्यांनी लिहली आहेत.ते एक उत्कृष्ट कलावंत असुन "द रिअल हिरो.डाँ प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात नाना पाटेकर यांचे बरोबर भुमीका केली आहे.
     अनेक साहित्य अ.भा.साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग तर हजारो कविसंमेलनाचे
सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. शासनाच्या चांगल्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची त्यांनी आपल्या कविता गाणी व पथनाट्याच्या माध्यमातून केली आहेत, यादी त्यांचे अनेक संस्थांनी यासाठी सत्कार्य केले.
     हा पुरस्कार २६ मार्च हिंदी साहित्य मोरभवन सभागृह येथे श्रिपाल सबनिस,पुणे, डॉ.महेश चौगुले बेळगाव,  डॉ.के .पी.वासनीक दिल्ली यांचे हस्ते प्रदान करण्यात येईल असे अकादमी चे अध्यक्ष प्रा.दिपककुमार खोब्रागडे  यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
      या सन्मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments