जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्कच-- आ. सुधाकर अडबाले

जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्कच-- आ. सुधाकर अडबाले 


     

 वरोरा (प्रती )
राज्यात आज शिक्षक- कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्वांना सभागृहामध्ये वाचा फोडण्याची गरज असून 2005 पूर्वी आणि त्यानंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. लोकशिक्षण संस्थेद्वारा आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. 
            यावेळी याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील ,कार्यवाह प्रा विश्वनाथ जोशी आणि  ॲड  दुष्यंत देशपांडे यांची उपस्थिती होती 
       आपल्या प्रतिपादनात आमदार अडबाले म्हणाले की, देशात काही राज्यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला असताना महाराष्ट्र सरकार ती लागू करताना दिरंगाई करत आहे. यापुढे कर्मचार्‍यांची भरती ही विविध एजन्सीच्या माध्यमातून केली जाणार असून त्यामुळे पेन्शन योजना ही संपविण्याचे षडयंत्र सरकार करीत आहे. या धोरणाला विरोध करणार असल्याचे ते म्हणाले .आज महाराष्ट्रात जवळपास एक लाख शिक्षक- प्राध्यापकांचे पदे रिक्त असून शासनाने लवकर भरावे, वेतनेतर अनुदानाचा निकष बदलवावा, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी आणि इंग्रजी  कॉन्व्हेंट शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाने तातडीने अदा करावे. या संदर्भात पावले उचलली गेली नाही तर आंदोलन करू असेही आ अडबाले म्हणाले
    अध्यक्षीय समारोपात प्राध्यापक श्रीकांत पाटील यांनी शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनुदानित शाळा चालविणे कठीण झाले असून अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील अंतर वाढले आहे असे सांगत नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला असून त्याकरिता समाजाची मानसिकता बदलविणे आणि पालकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. एखाद्या संस्थेची ओळख ही शिक्षकांच्या कर्तुत्वामुळे आणि परिश्रमामुळे होते त्यातूनच चांगला विद्यार्थी घडतो. त्यामुळे शासनाने शिक्षण क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रा पाटील म्हणाले

     याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनी आणि कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले, आणि गुणवंता गुणवंत शिक्षक, विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल राखे यांनी तर संचालन राघवेंद्र आडोणी आणि आभार सुनिता उरकांदे यांनी मानले

 

Post a Comment

0 Comments