बार्टी मार्फत आरवट येथे समाजकल्याणच्या योजनांचा प्रचार प्रसार व ग्रामस्वच्छता अभियान

बार्टी मार्फत आरवट येथे समाजकल्याणच्या योजनांचा प्रचार प्रसार व ग्रामस्वच्छता अभियान

समतादूत डॉ. माधुरी उराडे यांनी केले मार्गदर्शन 




चंद्रपूर (प्रती )महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त  संस्था(बार्टी ) पुणे च्या मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त 1 एप्रिल ते 1मे पर्यंत सामाजिक समता पर्व राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने आरवट येथिल पंचशील बुद्ध विहारामध्ये चंद्रपूर तालुका समतादूत डॉ. माधुरी उराडे(खोब्रागडे)यांनी उपस्थित ग्रामस्थांना बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले .तसेच बुद्ध विहार परीसर  व गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.याप्रसंगी समाजकल्याण विभाग चंद्रपूरचे मा.संतोष 
सिडाम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आरवटच्या सरपंच मा.सुलभा भोंगरे यासुद्धा उपस्थित होत्या.व आरवट येथील पंचशील बौद्ध मंडळाचे अध्यक्ष मा.अरुण सोनटक्के सचिव मा.सचिन दुधे कोषाध्यक्ष मा.गणेश करमनकर.मंडळाचे सदस्य प्रणिश दुधे,मंगेश दुधे,प्रशांत मुन,सुनील दुधे तसेच आरवट शाखेच्या भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मा.संध्याताई दुधे,सचीव किरण गावंडे, कोषाध्यक्ष करूणा दुधे,तसेच गावातील महिला मंडळाच्या महिला आम्रपाली दुधे,जया सोनटक्के,वैशाली नाईक व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments