संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा,आनंदवन ने साधली 100 टक्के निकालाची हॅटट्रिक.

संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा,आनंदवन ने साधली 100 टक्के निकालाची हॅटट्रिक.




वरोरा( प्रती )ज्येष्ठ कर्मयोगी बाबा आमटे यांनी दिव्यांग व्यक्ती प्रशिक्षण व पुनर्वसन हेतूने 1972 ला महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित संधि निकेतन अपंगांची कर्म शाळा,आनंदवन या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली.सदर प्रशिक्षण केंद्र हे दिव्यांग कल्याण आयुक्तालय,पुणे यांची मान्यता प्राप्त असून यात दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण केंद्रामार्फत आजवर शेकडो दिव्यांगाचे संस्थेत व संस्थेच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे.. दोन दशकांपूर्वी संस्थेने एक पाऊल पुढे टाकीत दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. विकास आमटे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणा सोबत खाजगी परीक्षा योजने अंतर्गत (17 no.फॉर्म)दहावी व बारावी परीक्षेची विनामूल्य निवास व शिकवणी वर्गाची सोय करण्यात आली. यावर्षी लागलेल्या नुकतेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी 100 टक्के यश संपादन केले त्याच श्रृंखलेत मानाचा तुरा रोवत महाराष्ट्र राज्य कौशल्य ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या जाहीर निकालात ही कर्मशाळे ने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत हॅटट्रिक साधली. सदर मंडळाचे मान्यता प्राप्त अभ्यासक्रम शिवण व कर्तन ( प्रात्यक्षिक), एलिमेंटस ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉन असेम्ब्ली अँड टी वी मेंटेनन्स या तीन अभ्यासक्रमात 71 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्व उत्तीर्ण झाले. यात अनुक्रमे विभाग निहाय अनिकेत झाडे - 91% , आयुष चेनुरवार - 84.50% व दीपक चौधरी - 71.50% यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर यशा करीता व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार, विभाग निदेशक महेश भगत, गिरिधर मसराम , अश्विनी आंधळकर यांनी परिश्रम घेतले.एका शैक्षणिक वर्षात शंभर टक्के निकालाची हॅटट्रिक साधल्याने आत्मविश्वास दुणावला आहेच पण जबाबदारी ही वाढली आहे. आम्ही सगळे ही परंपरा कायम राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू "असे भावोद्गार अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांनी काढले.
सदर यशा करीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे, अंतर्गत व्यवस्थापिका सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ,विश्वस्त, श्री. सुधाकर कडू , श्री. सदाशिव ताजने,श्री. माधव कवीश्वर यादी मान्यवरांसह आनंदवन वासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले.. पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments