शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू - रवींद्र शिंदे

रवींद्र शिंदे यांचा नेतृत्वात पक्षात इनकमिंग सुरु

शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांचे  प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू - रवींद्र शिंदे


वरोरा (प्रती )
     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेशान्वे जानेवारी २०२३ ला वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुखपदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती  करण्यात आली. रवींद्र शिंदे यांनी केलेले कार्य, कामाप्रती निष्ठा, संघटन कौशल्य याच्या जोरावर तसेच नागरिकांचा रवींद्र शिंदे यांचा नेतृत्वावर विश्वास दाखवीत विधानसभा क्षेत्रातील तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला.
     यात सामाजिक कार्यात अग्रेसर महिलासुद्धा रवींद्र शिंदे यांचा नेतृत्वावर पक्षाशी जुळल्या व जुळत आहेत. मध्यवर्ती कार्यालय "शिवालय" वरोरा येथे शुभांगी विजय डाखरे व प्रा. प्रीती पोहाने यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. महिला शिवसैनिक तथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष अश्लेषा मंगेश भोयर यांचा उपस्थितीत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर तसेच वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या हस्ते  श्रीफळ व शिवबंधन बांधून पक्षप्रवेश पार पडला.  तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा स्त्रियांचा सन्मान करणारा असून कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचे उल्लेखनीय कार्य सोबतच रवींद्र शिंदे यांची कोरोनाकाळातील समाजाकरिता केलेले अविरत सेवा हे कौतुकास्पद असून यांचा कार्याशी प्रेरित होत मी पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचे सामाजिक कार्य करण्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी जुळले असे प्रा. प्रीती पोहणे यांनी विचार व्यक्त केले तसेच रवींद्र शिंदे यांनी कार्य करण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त केले.
   याप्रसंगी आभासी पद्धतीने बोलतांना रवींद्र शिंदे म्हणाले कि वरोरा-भद्रावती मध्ये शिवसेना अधिक भक्कम करण्यासाठी टाकलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणायला हवं. यांचं शिवसेनेत मनापासून स्वागत. सगळ्या शिवसैनिकांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच शिवसेनेच्या माध्यमातून जनतेचे गावपातळीवरील प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू.
    याप्रसंगी भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती अश्लेषा जिवतोडे भोयर, शिवसैनिक चिंतामणी मांडवकर, विजय मधुकर डाखरे,रुपेश चिंचोलकर, उज्वल काळे, ओंकेश्वर टोंगे,अक्षय बंडावार, निखिल मांडवकर, सृजन मांढरे तसेच शिवसैनिक महिला कार्यकर्त्या व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments