भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल



चंद्रपूर/वरोरा - वरोरा तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी IPS आयुष नोपाणी रुजू झाल्यावर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती घाटावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केल्यावर अवैध वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात बंद झाली होती, नोपाणी यांच्या दबंग भूमिकेमुळे अनेकांनी अवैध धंदे सुद्धा स्वतः बंद केले होते, मात्र त्यानंतर वरोरा तालुक्यात वाळू घाट चालकांना एका डॉक्टरने रंगदारी मागीतल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे, याप्रकरणात वाळू घाट चालक शुभम चांभारे यांनी त्या डॉक्टरवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

29 वर्षीय शुभम चांभारे मागील 4 ते 5 वर्षांपासून रेतीचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र इतक्यात भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिट भद्रावती येथील वाळू घाटावर जात त्याठिकानचे फोटो काढत सुपरवायझर आशुतोष घाटे याला धमकविण्याचे प्रकार सुरू केले.

डॉ. दाते हा महिन्याभरापासून चांभारे यांच्या वाळू घाटावर जात त्यांना पैश्यासाठी त्रास देत होता, इतकेच नव्हे तर दाते हा इतरांकडून चांभारे यांना माहिती पाठविण्याचे काम करायचा की कलेक्टर, SDPO, SDO व तहसीलदार यांचे डॉ. दाते सोबत चांगले संबंध आहे, कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी दाते यांनी 7 लाख रुपयांची खंडणी चांभारे यांना मागितली होती.
चांभारे यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, मात्र 9 जून ला सकाळी 12 वाजेदरम्यान डॉ. दाते यांनी सुपरवायझर घाटे याला कॉल करीत मी कलेक्टर सहित सर्व अधिकाऱ्यांना सांभाळतो त्याकरिता मला आता 32 हजार रुपये RTGS किंवा फोन पे द्वारे ट्रान्सफर करा, हे सर्व संभाषण चांभारे यांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले.
त्यानंतर या सर्व प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये चांभारे यांनी केली, वरोरा पोलिसांनी कलम 385 अनव्ये डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर गुन्हा दाखल केला.


पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी म्हणाले की...
सदर गुन्हा हा जामीनात मोडत असल्याने डॉ. दाते यांना अद्याप अटक करण्यात आली नसून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले आहे, त्यांच्या आवाजाचे नमुने तपासण्याचे काम पोलीस करणार आहे, सोबतच याआधी त्यांनी असाच कुणाला पैश्यासाठी त्रास दिला आहे का? याबाबत तपास करण्यात येणार आहे, जर तपासात पुन्हा काही नवी माहिती मिळाली तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार.


Post a Comment

0 Comments