विनोद पाटील यांना मयूर वाळकेने केली जबर मारहाण

विनोद पाटील यांना मयूर वाळकेने केली जबर मारहाण
 जळका येथील घटना


 वरोरा (प्रति )जळका येथील एका वृद्धास मयूर वाळके याने काठीने डोक्यावर जबर मारहाण केल्याने ते जखमी झाले  सदर घटना ही 20जून 2023 च्या 12:30 वाजताची असून आरोपीला अद्याप ताब्यात घेतले नसल्याचे समजते
 
 विनोद डोमाजी पाटील (वय61वर्ष )आणि मयूर सूर्यभान वाळके दोघेही जळका येथील रहिवासी असून  हे एकमेकांच्या शेजारी वास्तव्यात आहेत दि. 20 जून  रोजी मयूर वाळके याने मिस्त्रीच्या हाताने संडास बाथरूमचे काम करतांना मध्ये असलेली भिंत फोडली त्यामुळे विनोद पाटील यांच्या बाथरूमचे स्लॅब क्रॅक गेले. मयूर वाळके याला भिंत का फोडली असे विचारणा केली असता वाळके याने मागचा पुढचा विचार न करता विनोद पाटील यांच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली असता ते  रक्तबंबाळ होऊन जखमी झाले त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भरती करण्यात आले. आरोपी मयूर वाळके विरुद्ध भांदवी कलम 324,504,506 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments