रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांचा युवा सेनेत पक्षप्रवेश

रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांचा युवा सेनेत पक्षप्रवेश




वरोरा (प्रती )
      मा. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख मा.आमदार आदित्य ठाकरे साहेब तसेच युवासेना सचिव वरूण सरदेसाई, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा येथे युवकांनी युवा सेना शिवसेना पक्षात प्रवेश करीत भगवा झेंडा हातात घेतला. वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर व भद्रावती तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल यांच्या उपस्थितीत वरोरा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देवतळे, कुणाल गलांडे, आशिष कुंभारे, सौरभ पोडे, सुरज भोयर, प्रज्वल कुंभारे, बंटी खोब्रागडे ,पालाश भोसले यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
      बाळासाहेबांच्या ब्रिद वाक्यानुसार शिवसेना पक्षाच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या धोरणानुसार समाजातील सर्व घटकातील लोकांच्या मदतीसाठी युवासेना संवैधानिक मार्गाने तत्पर राहून जनसेवेसाठी तयार राहील.आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिक कार्य करत असताना समाजाचं जास्तीत जास्त कसे चांगल करता येईल या गोष्टीकडे लक्ष देवून युवकांनी राजकारणासोबतच समाजकारण करण्यावर जास्त भर द्यावा,असे युवा पिढीला कानमंत्र देत रवींद्र शिंदे यांनी हिन्दु हृदयसम्राट बाळासाहेबाच्या शब्दांची आठवण करुन दिली.
      या पक्षप्रवेश प्रसंगी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अभिजीत पावडे, ज्येष्ठ शिवसैनिक गजानन कुरेकार, शिवसेना पदाधिकारी, नवनियुक्त युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments