अश्लील चाळे करणाऱ्या किरीट सोमय्यावर कारवाई करा : शिवसेना (उबाठा)

अश्लील चाळे करणाऱ्या किरीट सोमय्यावर कारवाई करा : शिवसेना (उबाठा)


शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय समोर शिवसेना महिला आघाडी तर्फे "निषेध आंदोलन'




वरोरा (प्रती)

इतर पक्षातील राजकीय मंडळींवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतः किती नैतिक व प्रामाणिक आहे याचा आव आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफीत एका खाजगी वाहिनीवर प्रसारित झाली आहे. या चित्रफितच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांचे अश्लील चाळे समाजासमोर आले व त्यांची खरी संस्कृती दिसून पडली. याचा विपरीत परीणाम समाजमनावर होतो, अशा कृत्याचा विरोध करून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात शिवसेना महिला आघाडी तर्फे किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवित शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय समोर "निषेध आंदोलन" करण्यात आले आहे. तथा किरीट सोमय्या सारख्या अश्लील नेत्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

किरीट सोमय्या याची चौकशी आता भाजप सरकारने करावी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रफितची सखोल चौकशी करून किरीट सोमय्या सारख्या अश्लील नेत्यावर कारवाई करावी. अशी मागणी या जाहीर निषेध आंदोलनातून करण्यात आली आहे. 

नैतिकतेचा मक्ता मिरवणाऱ्या भाजपच्या या सोमय्या बद्दल राज्याचे भाजपचे नेते कठोर भूमिका घेतील का? असा प्रश्न या आंदोलनातून विचारण्यात आला.

या आंदोलनाला महिला आघाडीच्या जिल्हा सघंटीका (वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी) सौ. नर्मदाताई दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, प्रा. आश्लेषा जीवतोडे, प्रा. प्रीती पोहाणे, शिव गुडमल, तेजस्विनी चंदनखेडे, प्रणाली मडकाम, नेहा बनसोड, गौरव नागपुरे, सीमा लेडांगे, पुनम सरपाते, ज्योती पोयाम, प्रतिभा मांडवकर, अभिजीत कुडे, निखिल मांडवकर, अनिल सिंग, शुभांगी डाखरे, स्वाती ठेंगणे, चंदू जीवतोडे, मंगेश भोयर, सृजन मांढरे, युवराज इंगळे, सूर्यवंशी सर, प्रा. निलेश शिरसागर, तेजस्विनी चंदनखेडे, ज्योती पोयाम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments