शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर युवकांचा विश्वास, शिवबंध बांधले, घेतला पक्षप्रवेश

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर युवकांचा विश्वास, शिवबंध बांधले, घेतला पक्षप्रवेश

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर युवा वर्गाच विश्वास

वरोरा (प्रती )

सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचा जनतेला विट आलेला आहे. सत्तेसाठी निष्ठा गहाण ठेवून राजकीय मंडळी वागत आहेत. जनतेच्या प्रश्नावर कुणाचेच लक्ष नाही. सत्तेत राहून मलिंदा लाटायचा व वाम मार्गाने कमावलेली संपत्ती सुरक्षित करायची, असा गोरखधंदा राजकारणी करीत आहेत. राज्यातील वातावरण गढूळ होत असताना मात्र शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपली निष्ठा व प्रामाणिकता कायम ठेवली आहे. पक्षांतर्गत व इतर पक्षाचे नेते भ्रष्ट राजकारणाचा भाग होत असताना उध्दव ठाकरे यांनी मात्र हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासून पक्षाचा सन्मान, आपला सोज्वळ राजकारणाचा आदर्श कायम ठेवला आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण हे हिन्दुहृदय सम्राट बाळासाहेबाचे ब्रीद जोपासत त्यांची कार्यशैली सुरू आहे. याच नितीला चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्याचे काम शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे सामाजिक कार्याला प्राथमिकता देत करीत आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने वरोरा व भद्रावती तालुक्यातील युवा कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत.
वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे तथा चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी संघटीका नर्मदा बोरेकर, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, समन्वयक वैभव डहाणे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल यांच्या नेतृत्वात कार्तीक गवळी, आर्यन लाख, साकी पठाण, गुड्डू खान, अफताब शेख, आमिन शेख, आर्यन हिवरे, गौरव बलके, शरद पुरी, सुजल तिखट, गणेश मेश्राम, नकुल करलुके, गणेश, तेजस सातपुते, अनुमन गोंडे, मंथन वडाळकर, आयफाज खान, नावेद खान, सुल्तान शेख, बिलाल खान, शद शेख, शुभम तिखट, वेदांत घुगल, सम्राट धोटे, अबदला शेख, आलमगीर शेख, योगेश सातपूते, अल्तामा शेख, अमित आस्कर असंख्य युवा कार्यकर्ते यांनी शिवबंध बांधीत पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख माया नारळे, तालुका संघटीका आश्लेषा जिवतोडे-भोयर, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, शहर प्रमुख खेमराज कुरेकार, घनश्याम आस्वले, प्रा. प्रिती पोहाणे, सरला मालोकर, शिला आगलावे, उप-शहर प्रमुख शिला चामाटे तसेच जेष्ठ व युवा शिवसैनिक पुरुष-महीला उपस्थित होते.
शिवसेनेत येणाऱ्या सर्व शिवसैनिकांनी ८०% समाजकारण व २०% राजकारण करीत जनसेवा हीच ईश्वरसेवा या उक्ती प्रमाणे कार्यरत असावे असे रविंद्र शिंदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments