संधिनिकेतन - आनंदवन येथे सामूहिक रक्षाबंधन सोहळा साजरा.

संधिनिकेतन - आनंदवन येथे सामूहिक  रक्षाबंधन सोहळा साजरा. 






आनंदवन -वरोरा
महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा व नीजबल - शिक्षा निकेतन प्रकल्पात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने दिंनाक 26 ऑगस्ट ला दिव्यांग मुला-मुलींची राखी बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलींइतकाच उत्साही सहभाग मुलांनी ही या स्पर्धेत दाखविला याचे विशेष कौतुक.अंगभूत कला हे खरेतर कर्णबधिर मुला-मुलींचे वैशिष्ट्य पण त्या इतकेच कौतुकास्पद असे अंशत: अंध व अस्थिव्यंग मुला-मुलींचे स्वयं-नवनिर्मितीतून एखाद्या कलेचा आनंद घेण्याचे कसब यात बघायला मिळाली. अंध मुला-मुलींना न दिसणाऱ्या धाग्यांच्या रंगसंगतीतून, त्यावर तयार होणाऱ्या (स्वतःला न दिसणाऱ्या) सुंदर नक्षीकामातून व  कर्णबधिर मुला-मुलींच्या बोलक्या हातांच्या कलेतून जेव्हा राख्या घडल्या गेल्या, तेव्हा त्यातून मिळणारा आनंद हा या दिव्यांग भावा-बहिनीं करिता अधिक खास होता. विशेष म्हणजे यात विद्यार्थ्यांनी पाने,फुले, प्लास्टिक,शंख , व इतर टाकाऊ वस्तू वापरीत ह्या राख्या तयार केल्या. आज दिनांक 30 ऑगस्ट ला रक्षा बंधन निमित्त याच राख्यांचा वापर करीत सामूहिक रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान उपस्थित शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले."कर्मशाळेत अश्याच प्रकारे नियमित सण साजरे करण्यात येतात त्यातून भारतीय संस्कृतीचे जतन करणे व घरापासून दूर असलेल्या दिव्यांग मुलांना घरचे वातावरण देण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून दिव्यांग व्यक्तीच्या कला गुणांना वाव दिला जातो".. असे प्रतिपादन व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार त्यांनी केले. सदर कार्यक्रमाला अश्विनी आंधळकर, अन्नपा गवंडी, रमेश बोपचे, इकृमुद्दिन पटेल, गणेश जायनाकर, प्रवीण थाठे,सौरव वानखेडे, राजू,झाडे, मुकेश पिपरे, सह सर्व कर्मचारी हजर होते.

Post a Comment

0 Comments