नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन रोटरी क्लब व भारतीय सोशल फाउंडेशनचा उपक्रम


नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन 
रोटरी क्लब व भारतीय सोशल फाउंडेशनचा उपक्रम


वरोरा(प्रती)आज दिनांक १५/०९/२०२३ रोजी रोटरी क्लब वरोरा तसेच भारतीय सोशल फाउंडेशन वरोरा यांच्या वतीने तान्हा पोळा
 नंदी सजावट स्पर्धेचे आयोजन जय भारतीय चौक वरोरा येथे घेण्यात आली होती .
या स्पर्धेत एकूण २५० स्पर्धकांनी भाग घेतला . परीक्षक श्री प्रल्हाद ठक सर व सागर कोयाळवार सर यांनी सर्व नंदीबैलाचे परीक्षण करून सर्व स्पर्धकांना प्रो्साहन बक्षीस देण्यात आले.
 विशेष प्रोत्साहन बक्षीस 
वरद डोंगरवार  व राज वीर शर्मा या बालक स्पर्धकांना देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांशी बुरटकर हिला प्रथम पुरस्कार हिला देण्यात आला व प्रथम क्रमांकाचे बक्षीस सायकल देण्यात आली तसेच दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस अधिराज डोंगरवार या बालक स्पर्धकाला स्टडी टेबल देण्यात आले. तसेच तृतीय बक्षीस देवांशी तांदूळकर या बालक स्पर्धेकाला स्कूल बग देण्यात आले कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी युवक युतीने प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी असिस्टंट गव्हर्नर नितेश जयस्वाल, प्रोजेक्ट  डायरेक्टर रोटेरियन योगेश डोंगरवार ,पवन भुजाडे, अमित नहार ,राम लोया, जोगी सर, हिरालाल बघेले  रोटरी चे  पदाधिकारी अध्यक्ष श्री डॉक्टर सागर वझे व सचिव ऍड मधुकर फुलझेले कोषाध्यक्ष मनोज कोहळे रोटरीचे सदस्य हजर होते तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय भारती सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला या कार्यक्रमामुळे बालक स्पर्धकांना विशेष ऊर्जा निर्माण झाली .

Post a Comment

0 Comments