तान्हा पोळा, सौरभ, आर्यन आणि ईशांत पुरस्काराचे मानकरी


तान्हा पोळा
सौरभ, आर्यन आणि ईशांत पुरस्काराचे मानकरी





वरोरा (प्रती)तान्हा पोळा उत्सव समिती इंद्रनगरी (बोर्डा )कश्यप प्लाझा मंगल कार्यालय मागील परिसरातील इंद्रनगरी, ओंकार नगर , गणेश नगरी येथे वास्तव्यास असलेले नागरिक यांचे संयुक्त विद्यमाने आज रोजी दि१५/०९/२३ रोजी सायंकाळी ५ वा. चे सुमारास तान्हा पोळ्याचे  आयोजन करण्यात आले होते . यासाठी परीक्षक म्हणून  अविनाश कांबळे (शिक्षक) लोकमान्य विद्यालय वरोरा , गजानन सातपुते( शिक्षक) आशीर्वाद ले आऊट ,  प्रफुल खुजे , वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांना परीक्षक म्हणून नेमण्यात आले होते . यासाठी एकूण ५० नंदीबैलांचा या तान्हा पोळ्यामध्ये सहभाग  होता . यासाठी प्रथम पुरस्कार म्हणून राहुल भाऊ ठेंगणे उपसरपंच ग्रामपंचायत बोर्ड यांनी सायकल , द्वितीय पुरस्कार अरविंद  माथनकर यांनी सायकल आणि तृतीय पुरस्कार म्हणून  डॉ प्रफुल्ल खुजे  यांनी कॉम्प्युटर बोर्ड कम्प्युटर टेबल हे पुरस्कार दिलेले होते तसेच आयोजन समितीमार्फत प्रोत्साहन पर दोन बक्षीस सुद्धा आणि इतर बक्षिस सुद्धा ठेवले होते यामध्ये परीक्षकांनी निवड करून प्रथम विजेते म्हणून सौरभ निकोडे द्वितीय पुरस्कार आर्यन घोलप, तृतीय पुरस्कार ईशांत कोराशे आणि प्रोत्साहन म्हणून अवधूत सालवटकर,लक्ष कळसकर यांची निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments