मोठी जबाबदारी ;अमर गोंडाणे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

मोठी जबाबदारी ;अमर गोंडाणे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या सचिवपदी नियुक्ती


वरोरा (प्रती ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते मान.खा.राहुलजी गांधी , सोनियाजी गांधी , राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश निलोथीयाजी , महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले , सिद्धार्थ हत्तीभरे यांच्या आदेशाने आज महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या काही नियुक्त केल्या गेल्या आहेत ; त्यात अमर गोंडाणे यांना संधी देण्यात आली आहे. अमर गोंडाणे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या सचिव पदी नियुक्त केले आहे.
गोंडाने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अखिल भारतीय युवक काँग्रेसने 2021 मध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त म्हणून नियुक्ती केली होती अमर गोंडाणे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत काँग्रेस पक्षाचे भूमिका , ध्येय , धोरण प्रखरतेने मांडून तसेच अनुसूचित जाती - जमातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडून आंदोलनात्मक भूमिकेतून न्याय देण्याचा प्रयत्न अनेक प्रकरणात केला आहे याच पार्श्वभूमीवर अमर गोंडाने यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या सचिव पदी नियुक्ती केली असे बोलले जात आहे
    *अमर गोंडाणे कोण आहेत ?*
अमर गोंडाणे हे फुले ,शाहू आंबेडकरी चळवळीतून राजकारणात आलेले अत्यंत महत्त्वकांक्षी , अभ्यासू  ,आक्रमक असे सक्रिय युवा नेता म्हणून अमर गोंडाणे यांची ओळख आहे.
अमर गोंडाणे यांनी 2018 पासून आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी आंबेडकरी जनतेवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून अनेक प्रकरणात न्याय मिळून देण्याचा प्रयत्न  केला. त्यानंतर अमर गोंडाणे यांनी आपल्यात असलेल्या क्षमतेला सिद्ध केले आणी युवक कॉंग्रेसला प्रदेश प्रवक्ता म्हणुन नियुक्त करण्यास भाग पाडले. एक एक पायरी चढत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आपला ठसा उमटवत काँग्रेस पक्षात स्थान मिळवले. आज अमर गोंडाणे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या सचिव म्हणुन जबाबदारी स्विकारली.

Post a Comment

0 Comments