सारीम नगर "त्या" तान्हा पोळ्याने वेधले लक्ष चिमुकल्यांचा उत्साह आणि उपस्थितांची गर्दी

सारीम नगर 

"त्या" तान्हा पोळ्याने वेधले लक्ष


चिमुकल्यांचा उत्साह आणि उपस्थितांची गर्दी 







वरोरा (प्रती)वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील सारीम नगर परिसरात तान्हा पोळ्याचा सोहळा दी. 15/09/2023 रोज शुक्रवारी मोठ्या हर्ष उल्हासाने तान्हा पोळा उत्सव समिती सारीमनगर शांती नगर  यांच्या वतीने पार पडला.

 भारतीय संस्कृति ही कृषिप्रधान असल्यामुळे शेतकर्‍याचा सखा ,मित्र बैल सुद्धा वर्षभर शेतात राबत असतो,  त्या बैलाप्रति कृतघ्नता म्हणुन प्रत्येक गावच्या शिवारात बैल पोळा तसेच तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते. याच संस्कृतीचा वसा जपत बोर्डा गावात यंदा जवळपास 10 ठिकाणी हा सोहळा रंगला होता. बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे. बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे याअनुशंगाने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले गेले.

     सारीम नगर येथील तान्हा पोळ्याला शेकडोच्या संख्येने बालगोपाल आपापल्या नंदी बैलासह उपस्थित होते.  नागरिकांची अफाट गर्दी  चिमुकल्यांचा मोठा सहभाग 
तान्हा पोळा यासाठी बोर्डा गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.         
    बळीराजाचा खरा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस पोळा असून त्याच पध्दतीने लहान मुलांमध्ये सुद्धा हे संस्कार बिंबावे म्हणून तान्हा पोळ्याच आयोजन केले गेल्याच प्रास्ताविक करतांना अमर गोंडाणे यांनी प्रतिपादन केले. यावेळी परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी यांनी नंदि बैलांची पूजा केली. कार्यक्रमाला पाहुणे म्हणुन बोर्डा ग्रा. प. सरपंच यशोदाताई उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाला संबोधित करतांना त्यांनी भारतीय संकृतिमध्ये पोळा सणाचे महत्व सांगितले.
त्यानंतर आकर्षक बैलांचे निरीक्षण करून सर्व स्पर्धकांना बोर्डा ग्रामपंचायत सरपंच यशोदाताई खामनकर , ग्रा. पं. सदस्य प्रतिमाताई काटकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मिथुन खडसे यांनी केले शिवाय पोळा आणि शेती व्यवसाय याबद्दल माहिती सांगितली. 
  कार्यक्रमाला अनिल मोहिनकर , राहुल काकडे , राहुल वसाके , दिलीप दाते , विलास खापणे  पवनदास भैसारे , राकेश देवारकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उत्सव समितीचे सदस्य सागर काळे,  प्रफुल मडले ,अर्जुन तुरनकर , किशोर उगले,  इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते. 
  कार्यक्रमाच्या शेवटी राहुल काकडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments