जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत संधिनिकेतनच्या विद्यार्थ्यांची भरारी

जिल्हा स्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत संधिनिकेतनच्या विद्यार्थ्यांची भरारी



वरोरा (प्रती)

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, चंद्रपूर द्वारा दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा स्पर्धांचे आयोजन दिनांक ३ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. विनय गौडा, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान श्री. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर यांनी भूषविले सदर कार्यक्रमाला श्री. अतुलकुमार गायकवाड, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, श्री. डॉ. अशोक कटारे, जिल्हा आरोग्य अधिकारी व श्री. संग्राम शिंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर आयोजन हे श्री.सुरेश पेंदाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. या जिल्ह्यातील १२ अनुदानित व ३ विनाअनुदानित दिव्यांग शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन येथील एकूण *३५* दिव्यांग विद्यार्थ्यांनी १०० मी.,२०० मी.,४०० मी. धावणे, लांब उडी, गोळा फेक, बुद्धिबळ इत्यादी स्पर्धेत वयोगट निहाय व दिव्यांग प्रवर्ग निहाय भाग घेत यश संपादन केले. यात एकूण *३३* पदके पटकावली, ज्यात *२१ सुवर्ण* तर *१४ रौप्य* पदकांचा समावेश आहे. 
सांस्कृतिक कार्यक्रमात  कर्मशाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी महाभारतावर आधारित लक्षवेधी नृत्याविष्कार सादर करून प्रथम क्रमांक पटकाविला.

दिव्यांगांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. रवींद्र नलगिंटवार यांच्या नेतृत्वात कर्मशाळा चमू जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी झाली. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या या अतुलनीय यशात क्रीडा शिक्षक इक्राम पटेल, महेश भगत, गिरिधर मसराम, अश्विनी आंधळकर, प्रवीण ताठे, अन्नपा गवंडी, राजू झाडे, विवेक गलांडे आदी कर्मचाऱ्यांचे योगदान आहे. विजेत्या स्पर्धकांचे डॉ. विकास आमटे, सचिव महारोगी सेवा समिती, वरोरा श्री. कौस्तुभ आमटे, सौ.पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, श्री. सुधाकर कडू, श्री. सदाशिव ताजने, श्री. माधव कवीश्वर आदी मान्यवरांनी अभिनंदन व कौतुक केले व पुढील राज्य स्तरीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments