लोकमान्य महाविद्यालयाचे खेळाडू गोंडवाना विद्यापीठात

लोकमान्य महाविद्यालयाचे खेळाडू गोंडवाना विद्यापीठात

वरोरा (प्रती)लोक शिक्षण संस्था वरोडा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल खेळाडू कुमारी प्रिया डोंगे, मिसबहा पठाण, हर्षदा वैरागडे यांची छत्तरपुर, मध्यप्रदेश येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता गोंडवना विद्यापीठ, गडचिरोली संघात निवड झालेली आहे. याआधी प्रिया व मिसबा याने महाराष्ट्र शालेय व असोसिएशनच्या संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले आहे तर हर्षदा ही राज्य स्पर्धेत खेळलेली आहे. टेबल टेनिस मध्ये मुलांच्या संघात ओम सराते, आशिष गंधारे यांची आय. ई. एस. भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ संघात निवड झाली आहे. तसेच उज्वल नरड याची देवी अहिल्याबाई विद्यापीठ इंदोर येथे होणाऱ्या  पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या मुलांच्या बॅडमिंटन संघात निवड झाली आहे.



निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्णजी घड्याळपाटील , कार्यवाह श्री विश्वनाथ जोशी, कार्यवाह ऍड. दुष्यंत देशपांडे, प्राचार्य एस के. सिंग यांनी अभिनंदन केले.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक उत्तम देऊळकर यांना दिले. सर्वत्र खेळाडूंचे अभिनंदन केल्या जात आह.

Post a Comment

0 Comments