.....अन्य कोणत्याही समाजाला खऱ्या आदिवासीमध्ये समावेश करण्यात येवू नये... तुलसी अलाम

......अन्य कोणत्याही समाजाला खऱ्या आदिवासीमध्ये समावेश करण्यात येवू नये... तुलसी अलाम 

 मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन.






वरोरा (प्रति)


आदिवासी हा या देशाचा मुळ निवासी आहे. वनवासी नाही आदिवासीना भारतीय घटनेने अनुसूचीत जमाती म्हणून आरक्षणाचे अधिकार दिलेत मात्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून खऱ्या आदिवासीवर अन्यायच होत गेला खऱ्या आदिवासीना खऱ्या अर्थाने आरक्षणाचे हक्क मिळालेच नाहीत बोगस आदिवासीमुळे खऱ्या आदिवासीचे आतोनातं नुकसान झाले शिक्षणातील आणि नोकरीतील लक्षवेधी जागा जातीच्या खोट्या प्रमाणपत्राचे आधारे बोगस आदिवासीनी बळकावून घेतल्या कोर्ट -कचेऱ्या झाल्यात परिणामी अनु जमाती प्रमाणपत्र पडताळणी कमिट्याची स्थापना करण्यात आली त्यामुळे आता खऱ्या आदिवासीना न्याय मिळणार असे वारे समाजात वाहू लागले परंतु दि.15/06/1995 चा जी आर. आणि आता दि.22/10/2015 शा. प. मुळे खऱ्या आदिवासीच्या आशा अपेक्षा पार धुळीस मिळाल्या धनगर बंजारा व अन्य कोणत्याही समाजाला खऱ्या आदिवासी मध्ये समावेश करण्यात येवू नयेअसे तुलसी आलाम यांनी निवेदनात म्हटले आहे
दि.20/11/2023 या धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करण्याकरीता स्थापन करण्यात आलेली अभ्यास गट समिती बरखास्त्त करण्यात यावी या मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments