आनंदवनच्या मूकबधिर विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आनंदवनच्या  मूकबधिर विद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक  कार्यक्रम संपन्न





वरोरा (प्रती)

महारोगी सेवा समिती  द्वारा संचालित  आनंद  मूकबधिर  विद्यालय, आनंदवन  येथे दिनांक  8 व  9 जानेवार 2024 ला क्रीडा स्पर्धा  व  सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन   करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या  क्रीडा व कलागुणांना  वाव मिळावा  म्हणून  आनंद मूकबधिर विद्यालयात विविध  स्पर्धांचे  आयोजन  करण्यात  येते.  कर्णबधिर दिव्यांगत्वाबद्दल समाजात जागृती व्हावी या उद्देशाने  समाजातील  प्रतिष्ठित  तसेच सामाजिक  कार्याची आवड असणार्‍या  व्यक्तिंना  शाळेत   कार्यक्रमासाठी  बोलावण्याची  प्रथा आहे.  यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोटरीयन मा. अमित लाहोटी   आणि वरोरा येथील  व्यावसायिक  श्री. महेश  जाकोटीया  तसेच  याच शाळेतील सेवानिवृत  विशेष शिक्षक  कवि व समिक्षक श्री. दीपक शिव  , आनंदवन  ह्यांना  आमंत्रित  करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे  मुख्याध्यापक श्री.  विजय भसारकर  ह्यांनी केले. ह्यामध्ये  त्यांनी  शाळेविषयी  माहिती दिली तसेच  कर्णबधिर  विद्यार्थी  क्रीडा व  सांस्कृतिक  क्षेत्रात सामान्य  विद्यार्थ्यां प्रमाणेच  प्राविण्य मिळवतात  अशी  माहिती दिली.  यानंतर  शाळेचे कला शिक्षक श्री.  प्रल्हाद ठक यांनी चित्रकला व हस्तकला हे विशेष कर्णबधिर  विद्यार्थीचा प्राण असल्याचे सांगितले .  यानंतर  श्री. दीपक शिव यांनी  कर्णबधिर  विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन  दिले  तर  हे  विद्यार्थी  कशातच  मागे येत नाहीत असे  सर्व  विद्यार्थ्यांचे  कौतुक केले.  प्रमुख पाहुणे महेश  जाकोटीया यांनी  विशेष शैलीत  विद्यार्थ्यांना  शुभेच्छा  दिल्या तर  योग अभ्यासाचे काही प्रात्यक्षिक  करून  विद्यार्थ्याचे  मनोरंजन केले.  मा. अमित लाहोटी यांनी मुलांनी केलेली केशरचना व मेहेंदीचे निरीक्षण करून  सर्व  विद्यार्थ्यांचे  कौतुक केले व  शुभेच्छा  दिल्या. या  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री.  उमेश घुलक्षे  यांनी  केले  तर आभार प्रदर्शन  श्री.  रविकांत  घोलप  यांनी केले. साईन लॅंग्वेज मधून विद्यार्थ्यां पर्यंत माहिती  पोहोचवण्याचे काम  सौ.  शुभांगी  कडू  यांनी  केले. मुलांनी काढलेल्या रांगोळी स्पर्धाचे परीक्षण आनंदवनच्या सौ. सारीका सवसागडे यांनी केले.
        या  संपूर्ण    क्रीडा व  सांस्कृतिक  कार्यक्रमासाठी  संस्थेचे  सचिव आदरणीय  विकास भाऊ  आमटे ,  मा. भारती आमटे, मा. कौस्तुभ  आमटे, सौ.  पल्लवी  आमटे, संस्थेचे  विश्वस्त  मा. कडू  सर  यांनी  सर्व  विद्यार्थी व  शिक्षकांना  शुभेच्छा दिल्या . या  दोन  दिवसीय  कार्यक्रमात  विविध  स्पर्धेचे  आयोजन  करण्यात आले होते.  यामध्ये  सर्व  विद्यार्थिनी  उत्स्फूर्त सहभाग घेतला  व  चुणूक दाखवली .  याप्रसंगी  शाळेतील  सर्व  शिक्षक  व  कर्मचारी  यांचे  सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments