विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना परिश्रम घ्यावे --विनोद पुसदकर

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना परिश्रम घ्यावे --विनोद पुसदकर
  


वरोरा (प्रती)
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणे आता गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या परीक्षांमध्ये यश प्राप्त करता येईल. महाराष्ट्रातील मराठी मुलांनी परिश्रम घ्यावे आणि आपला टक्का या परीक्षांमध्ये वाढवावा असे प्रतिपादन जीएमआर कंपनीचे कार्पोरेट अफेअर प्रमुख विनोद पुसदकर यांनी केले. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते
             याप्रसंगी मंचावर लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, कार्यवाह प्रा विश्वनाथ जोशी, जीएम आर वरलक्ष्मी फाउंडेशनचे ज्येष्ठ अधिकारी सुनील विश्वकर्मा, प्राचार्य राहुल राखे, उप मुख्याध्यापक दीपक नवले उपस्थित होते.
          प्रतिभा वाचनालयाच्या वतीने वरलक्ष्मी फाउंडेशन विद्यार्थ्यांकरिता सर्वोतपरी मदत करीत असून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. आता विद्यार्थ्यांनी संरक्षण क्षेत्रात प्रवेश करावा आणि नव्या नव्या संधींचा शोध घ्यावा असेही पुसदकर म्हणाले.
           प्रा श्रीकांत पाटील यांनी अलीकडच्या काळात मुलांचे वाचन कमी झाल्याची खंत व्यक्त केली करीत विद्यार्थ्यांनी वाचनाची एकाग्रता वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. प्रतिभा कुठे जन्माला येईल हे सांगता येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी निराशेला मागे टाकून आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे आणि जगात काय चालले आहे याची माहिती घ्यावी असे ते म्हणाले
          याप्रसंगी दोन शीतयंत्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील विश्वकर्मा यांनी तर संचालन डॉ प्रशांत खुळे यांनी केले. आभार वरलक्ष्मी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी सुवर्णा काळे यांनी मानले

Post a Comment

0 Comments