वरोरा येथे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध

वरोरा येथे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध   
                      वरोरा(प्रती) राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री मा.ना.नवाब मलिक  गेल्या काही महीन्यापासून केंद्र सरकारचे आणि भाजप नेत्यांनी केलेले घोटाळे बाहेर काढत होते त्यामुळे काल अचानक त्यांच्या घरी जाऊन कोणत्याही नोटीस न देता त्यांच्या घरी धाड टाकली व कोणतेही पुरावे नसताना त्यांना अटक केली .ह्याच गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज गांधी चौक वरोरा येथे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने निषेध करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते अॕड मोरेश्वर टेमुर्डे  ,मा.आ.प्रतिभाताई धानोरकर,आमदार मा.मुकेश जिवतोडे जिल्हाप्रमुख शिवसेना,यांच्या नेत्वृवात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार माल्यार्पण करुन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी व निर्दशने करण्यात आली तसेच उपविभागीय अधिकारी वरोरा मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार  यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी रंजना पारशिवे,अविनाश ढेंगळे,राजेंद्र वरघने बंडूजी भोंगाडे ,विलास नेरकर ,चंद्रकांत कुंभारे ,अरुण सहारे बंडूजी डाखरे ,दिनेश मोहारे ,गोविंदराव ठेंगणे,सुशिला तेलमोरे,सुनिता नरडे,मोनाली काकडे,जनाबाई पिंपळशेन्डे ,शिल्पा रुयारकर,नंदा गवई,व महाविकास आघाडी मधील पदाधिकारी व कार्यकर्ता बहूसंख्याने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments