मोक्षधामात महिलेचा मृतदेह ठेवणारा "तो"वरोऱ्याचा आरोपी कोण?

मोक्षधामात महिलेचा मृतदेह ठेवणारा  "तो"वरोऱ्याचा आरोपी कोण?
वरोरा(प्रती)  यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील  मोक्षधामात एका तरुण महिलेचा मृतदेह टाकल्याची घटना घडली असता ,परिसरात एकच खळबळ उडाली होती,या घटनेतील एक आरोपी वरोरा येथील असल्याचे  बोलल्या जाते "तो"आरोपी कोण?याचा पोलीस तपास करीत आहेत,,
दि,.२४ फेब्रुवारी रोजी सायं ५;०० वाजल्याच्या दरम्यान एका ॲम्बुलन्सने एका तरुण महिलेचा मृतदेह राळेगाव येथील मोक्षधामात अज्ञातांनी ठेवला होता,यामध्ये दोन पुरुष आणि एक स्त्री असे तिघेजण सदर मृतदेहाला ॲम्बुलन्समध्ये घेऊन आले  असल्याचे काही नागरिकांनी पाहिले, त्यांच्या कडे चौकशी केली असता  आमची येथे सासुरवाडी असून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येथे आणल्याची बतावणी केली ,आणि काही वेळातच पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने ॲम्बुलन्स तेथून पसार झाली सदर आरोपींनी राळेगाव येथील पेट्रोल पंपावर पेट्रोलही भरल्याचे सांगण्यात येत आहे .महिलेचा मृतदेह बेवारस सोडून पळ काढण्याचे नेमके कारण काय? ही महिला कोण ?घातपात की पुन्हा काही याचा छडा लावण्याचे आव्हान आता राळेगाव तसेच वरोरा पोलीसांसमोर आहे .या प्रकरणातील एका संशयित आरोपीला राळेगाव  पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्या आरोपीने काही गोष्टीचा खुलासा केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले  मृतक महिलेचे आणि वरोरा येथील संशयित आरोपीचे प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती  मिळाली असून हे दोघेही गेल्या तीन वर्षापासून एकत्र राहत होते, पुढील तपास पोलीस करीत आहेत,,,

Post a Comment

0 Comments