टिम वन' तर्फे देण्यात आला कोविडग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात

'टिम वन' तर्फे देण्यात आला कोविडग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात


चंद्रपूर :(प्रती)
चंद्रपुरातील एक जेष्ठ समाजसेवी ऋषितुल्य व्यक्तिमत्व असे माननीय मनोहर सप्रे सर यांच्या संकल्पनेतून आणि माझी मेहनत आणि आपल्या सर्वांचे सहकार्य यातून साकार झाली टीम वन. यामध्ये कोणीही अध्यक्ष नाही ना कोणी सचिव. समाजातील गरजू लोकांना पाच हजारांपर्यंत मदत करून स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करणे हा या टीमचा मुख्य उद्देश. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि दुर्धर आजाराने ग्रस्त असणाऱ्या गरीब कुटुंबीयांना मदत करणे हा सुद्धा या टीमचा उद्देश. मागच्या वर्षी २०२१ मध्ये कोवीड या आजाराने आपल्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख गमावलेल्या आणि दोन लहान मुलांची जबाबदारी असणाऱ्या प्रीती बुरचुंडे राहणार माजरी तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर या महिलेला दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ ला शासकीय विश्रामगृह परिसरात चहाचा स्टॉल टाकण्यासाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. याप्रसंगी माझ्यासोबत बहुजन ललकार या वृत्तपत्राचे संपादक, दलितमित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर, इंजि. प्रदिप अडकिणे, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव उंदीरवाडे, सुधाकर मोकदम, सुर्या अडबाले आणि बुरचुंडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी समाजातील गरजू व गरीब लोकांनी मदतीसाठी 'टिम वन' शी संपर्क साधण्याचे आवाहान 'टिम वन' च्या सदस्यांची केले आहे.

Post a Comment

0 Comments