चांगले आरोग्य हीच खरी आयुष्याची पुंजी-रमेश राजुरकर

वरोरा(प्रती)दिनांक २२ मार्च २०२२ रोज मंगळवार
ला शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ स्या निमित्याने सेवा गृप फाउंडेशन मार्फत सकाळी ९.०० वाजता मिनाक्षी गॅस एजन्सी समोरील पटांगणावर मोफत . आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेने अध्यक्ष तमेन प्रसिद्ध उद्योगपती मा. . रमेश महादेवराव राजुरकर • उपस्थित होते.

चांगले आरोग्य हीन खरी आयुष्याची पुंजी आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोणाकाळात आरोग्याचे चांगलेच महत्व आपल्याला पटले आहे. तसेच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे आपण मानतो. प्रत्येकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत वर्षातून एकदा तरी रक्तदान केले पाहिजे. तसेच तरुणांनी आता जबाबदारी स्वीकारावी मग ती स्वतःच्या कुटूंबाची असो या चांगल्या समाजाची असो. व्यसन मुक्ती समाज निर्माती साठी तरुणांनी पुढे येउन सहकार्य केले पाहीजे. समाजामध्ये जिवन जगत असतांना आणि भारताचे भविष्य पडवीतांना तरुणांचा खुप मोठा बाटा असतो. म्हणुनच तरुणांना भारताचे भविष्य म्हटले जाते. मग याकरीता तरुणांनी स्वतःची व आपल्या कुटूंबाची आर्थीक प्रगती करणे आवश्यक आहे.

वाढती बेरोजगारी पाहता तरुणांनी उद्योग व स्वयंरोजगार सुरू करावेत. वरोरा शहराच्या सभोवती असलेल्या बन्याच रामध्ये दुसऱ्या राज्यातील मुल कामाला ठेवले आहेत. आपल्याला स्थानिक रोजगाराच्या नावाखाली काहीच मिळत नाही. नोकरी पाहिजे असेल तर त्या करीता तरुणांनी तांत्रीक शिक्षण व प्रशिक्षण घेतले पाहीजे. आमच्या जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या क्षेत्रामधील अनेक तरुणांना तांत्रीक प्रशिक्षण घेण्याकरीता पाठविले आहे. प्रशिक्षणामध्ये जेसीबी, लोडर ऑपरेटर, हायवा चालक, क्रेण ऑपरेटर, पीसी ऑपरेटर अश्या अनेक मोठ्या मशीनरी आहेत. ज्यांना हाताळण्या करीता प्रशिक्षीत व्यक्तींची आवश्यकता असते.

माझे तरुणांना आव्हाण आहे की त्यांनी माझ्या कार्यालयामध्ये यावे माझ्या जवळ प्रशिक्षणा बद्दल जे माहिती आहे ते आम्ही तुम्हाला देउ आणि त्या विषयी मार्गदर्शन सुद्धा करू असे प्रतिपादन रमेश राजुरकर यांनी आपल्या भाषणात केले.

I

Post a Comment

0 Comments