भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा विरोधात गुन्हा दाखल करा मुस्लिम समाजाची निवेदनातून मागणी

भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा विरोधात गुन्हा दाखल करा
मुस्लिम समाजाची निवेदनातून मागणी


वरोरा:-भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त केलेल्या वक्तव्यामुळे नुपूर शर्मा वर गुन्हा दाखल करा अशी मागणी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस  अधिकारी आयुष्य नोपानी यांच्या कडे एका निवेदनातून करण्यात आली,  इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

नुपूर शर्मा हिने  राष्ट्रीय वाहिनीवर प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे वृत्त आहे. यानंतर वरोरा मुस्लिम समाज बांधवांनी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांना निवेदन देऊन  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांनी सांगितले की, नुपूर शर्मा विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल, द्वेष पसरवणे आणि इतर धर्मांविरुद्ध टिप्पणी केली आहे.
नुपूर शर्मा एका खासगी टीव्ही चॅनलच्या डिबेटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. हा वाद वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीवर होता. यावेळी तिने इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चर्चेदरम्यान नुपूर शर्मा म्हणाली होती की जर लोक सतत हिंदू धर्माची खिल्ली उडवत असतील तर मी इस्लामबद्दलही असेच करू शकते. यानंतर तिने प्रेषित मोहम्मद यांच्याशी संबंधित एका घटनेचा मजेशीरपणे उल्लेख केला होता. त्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यामुळे देशभरातून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या ,निवेदन देतांना  अफसर शेख,सलिम पठाण, शब्बीर शेख,मूशताक शेख,समीर पठाण,शाहीद काजी,वसीम शेख, शोएब शेख, शहाबाज शेख, शहजाद शेख, दानिश शेख,राजिक शेख,समिर शेख, शाहरुख शेख, गुड्डू शेख,नवेद शेख,अस्लम शेख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments