दीक्षांत सोहळा थाटात पडला पार

दीक्षांत सोहळा थाटात पडला पार

गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव



वरोरा(प्रती)
आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा जी. चंद्रपुर येथे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2022 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य दिक्षांत समारंभ खालील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला 
 या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा श्री डॉ भालचंद्र चोपने माजी  कुलगुरू नागपूर विद्यापीठ तथा माजी संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई 
मा श्री भुपेंद्र शहाणे फॅक्टरी मॅनेजर पी व्ही टेक्स्टाईल जाम 
श्रीमती राधा सवाने उपप्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा 
 संस्थेचे प्राचार्य मा श्री जी यु राजूरकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला 
ह्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी त्यांच्या भविष्यातिल संधी विषयावर मार्गदर्शन केले 
संस्थेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले 
 संस्थतील मागील वर्षात घेण्यात आलेल्या उपक्रमाविषयी व प्राप्त यशस्वी अभियाना संदर्भात अहवाल वाचन गटनीदेशक श्री जी आर दहापुते यांनी केले 
 कार्यक्रम संचलन श्री दिगंबर फाळके सर तसेच आभार प्रदर्शन श्री विकास देशमुख यांनी केले  
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments