या स्पर्धकांनी मारली बाजी : रसिकांची भरभरून दाद

रोटरी सारेगमप  विदर्भ स्तरिय गीत गायन स्पर्धा

या स्पर्धकांनी मारली बाजी

रसिकांची भरभरून दाद





वरोरा(प्रती)  रोटरी क्लब वरोऱ्याच्या वतीने स्व.संजयबाबू देवतळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ,श्री करण देवतळे प्रायोजित रोटरी विदर्भस्तरीय सारेगमप प्रवास सप्तसुरांचा या गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी दि.१५ऑक्टोबर२०२२रोजी सायं७:००ते१०वाजताच्या दरम्यान  डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे घेण्यात आली .
सदर गीत गायन स्पर्धेच्या कार्येक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते, ऑडिशन राउंड मध्ये निवड करण्यात आलेल्या एकूण २१स्पर्धकांनी आपल्या गीताचे सादरीकरण केले असता, यामधून प्रथम पुरस्कार अमोल देऊलवार ,चिमूर ,द्वितीय पूरस्कार स्वरा लाड, यवतमाळ,तर तृतीय पुरस्कार अवंती घुडे वरोरा यांनी पटकाविला.वृषभ लोनबले,हिंगणघाट, मयूर पटाईत, नागपूर,आणि राकेश काळे, वरोरा यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली तर १२ते१८वयोगटातील असणारे युवराज लोया आणि तन्वी कवाडे या स्पर्धकांना विशेष पुरस्कार देण्यात आला,
दि.९/१०/२०२२ला आशीर्वाद मंगल कार्यालय वरोरा येथे विदर्भ स्तरिय गीत गायन स्पर्धेचा ऑडिशन राऊंड घेण्यात आला होता,, त्यामध्ये  १०० पेक्षा अधिक स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदविला होता, काही स्पर्धेकांनी गाण्याचे व्हिडिओ पाठविले होते तर उपस्थित स्पर्धेकांनी आपली गीते सादर केली, या सर्व स्पर्धेकामधून २१ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. दि.१५ऑक्टोबर रोजी ग्रँड फिनाले (महा अंतिम फेरी)घेण्यात आली या फेरी मध्ये २१स्पर्धकांनी आपल्या गीताचे सादरीकरण केले असता वरील स्पर्धकांनी बाजी मारली 
या  विदर्भस्तरीय गीत  स्पर्धेचे परीक्षण सुरभी ढोमने, आणि सचिन ढोमने नागपूर या तज्ञ परीक्षकांनी  केले तर चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध असलेले म्युझिशियनकार्येक्रमाला लाभले होते सदर कार्येक्रमाला संगीतकला प्रेमींनी तसेच रसिकांनी भरभरून दाद दिली,या विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धेचे दमदार आयोजन रोटरी क्लब वरोरा चे पराग पत्तीवार ,अदनान सिद्दीकोट, योगेश डोंगरावर, आनंद बेदरकर, नितेश जयस्वाल, राहुल पावडे, नाना माटे, अभिजित मणियार, मनोज कोहडे, जित्तु मत्ते, नूतन जुनघरे,प्रफ्फुल कांबळे यांनी केले होते

Post a Comment

0 Comments