जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत संधीनिकेतन चे सुयश

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत संधीनिकेतनचे सुयश










वरोरा(प्रती)
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  समाज कल्याण विभाग
 जिल्हा परिषद , चंद्रपूर द्वारा दिव्यांग मुला- मुलींसाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 8 डिसेंबर ला तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर ( विसापूर) येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. विवेक जान्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती. वर्षा गौरकार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर ,श्री. अशोक मातकर,मुख्य लेखा वित्त अधिकारी, श्री. श्याम वाखरडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. कपिल कलोडे ,उप मुख्य कार्यकारी ,श्री. दीपेंद्र लोखंडे , शिक्षणाधिकारी ,जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री. सुरेश पेंदाम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर आयोजनात   सुमारे 81 क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यात जिल्ह्यातील 16  दिव्यांग शाळेतील 320 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. 
संधि निकेतन अपंगांची कर्म शाळा, आनंदवन येथील एकूण 34  दिव्यांग मुलांनी  100,200,400 मी धावणे, लांब उडी, गोळा फेक, बुद्धिबळ इत्यादी स्पर्धेत  वयोगट निहाय व दिव्यांग प्रवर्ग निहाय  भाग घेत यश संपादन केले. यात एकूण 44 पदके पटकावली ज्यात 33 सुवर्ण तर 11 रौप्य पदकांचा समावेश आहे.  सांस्कृतिक कार्यक्रमात ही शाळेने विशेष लक्ष वेधी पाणी वाचवा या मूकनाट्याचे सादरीकरण करीत क्रमांक पटकाविला.  सदर टीम कर्मशाळा  व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे नेतृत्वात जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी झाली . क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या या अतुलनीय यशात क्रीडा शिक्षक इक्राम पटेल, महेश भगत, गिरिधर मसराम, अश्विनी आंधळकर,प्रवीण ताठे, अन्नपा गवंडी, विवेक गलांडे, मुकेश पिपरे आदी कर्मचाऱ्यांचे  योगदान आहे.  विजेत्या स्पर्धकांचे डॉ. विकास आमटे,सचिव महारोगी सेवा समिती, आनंदवन श्री. कौस्तुभ आमटे, सौ.पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, सदाशिव ताजने, माधव कवीश्वर आदी मान्यवरांनी अभिनंदन व  कौतुक केले व पुढील राज्य स्तरीय स्पर्धे करीता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments