बल्लारपूर येथे समतापर्व सप्ताह उत्साहात पार

बल्लारपूर येथे समतापर्व सप्ताह उत्साहात पार   

समतादूत कु. अस्मिताने  दिले संविधानाचे धडे




चंद्रपूर(प्रती)महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या "डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" या स्वायत्त संस्थेमार्फत, बल्लारपूर तालुक्यातील समतादूत कु.अस्मीता गौतम वनकर यांच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान तालुक्यातील विविध ठिकाणी महाविद्यालये, बौद्ध विहार, पोलिस ठाणे, अंगणवाडी येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमादरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व प्रकल्प यांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. तसेच युवा गट आणि महिलांच्या गटांना सहभागी करून घेण्यात आले व त्यांना भारतीय संविधानातील मौल्ये यावर चिंतन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन, त्यांच्या संविधानविषयक ज्ञानात भर घालण्यात आली तसेच शाळां/ विद्यालये/ महाविद्यालये यांच्या शालेय वाचनालयांकरीता "चला संविधान समजून घेऊया" या लघु माहितीपुस्तिकांचे वितरण करण्यात आले. यात समतादूत कु.अस्मीता गौतम वनकर यांनी संविधान म्हणजे काय, संविधानाने आपल्याला काय दिले, संविधानाची गरज, संविधान आणि समाज कल्याण, संविधान नसते तर काय झाले असते..ई विषयावर विवेचन केले.सदर कार्यक्रम आयोजित करुन यशस्वी करण्यासाठी अनिता पंधरे मॅडम ( प्राचार्य बालाजी विद्यालय बामणी) कडवे सर ( माध्यमिक शिक्षक) , गुरनूले साहेब ( पोलिस काॅन्टेबल, पोलिस ठाणे बल्लारपूर), गीता भगत ( अंगणवाडी सेविका), ज्योती वाढई ( अंगणवाडी सेविका) या सर्वांनी परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments