रोटरी उत्सवात विविध सामाजिक संस्थांचा सन्मान

रोटरी उत्सवात सामाजिक संस्थांचा सन्मान
महिला सबलीकरणावर भर
हजारो नागरिकांनी लावली हजेरी



वरोरा(प्रती) रोटरी क्लब वरोऱ्याच्या वतीने नुकतेच सातव्या रोटी उत्सवाचे आयोजन २ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. पहिल्यांदाच तालुका क्रीडा संकुलवर दोन लाख चौरस फूट जागेवर हा उत्सव साजरा झाला.

यावर्षीचा उत्सवात महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला गेला आणि त्यांच्या उत्पादनांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले. वरोरा येथील रोटरी क्लबच्या वतीने मागील सात वर्षांपूर्वीपासून दरवर्षी रोटी उत्सवाचे आयोजन केले जाते आणि याला हजारो लोक उपस्थिती लावतात हे विशेष.
तालुका क्रीडा संकुलावर झालेला हा उत्सव प्रथमच दोन लाख वर्ग फूट जागेवर आयोजित करण्यात आला. उत्सवात विविध कंपन्यांच्या उत्पादनांची प्रदर्शनी व विक्री झाली. तसेच खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल या उत्सवात होती आणि मनोरंजनाची ही भरपूर व्यवस्था येथे असल्यामुळे त्याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.


     उत्सवाचे उदघाटन आनंदवनातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले. या उत्सवातील प्रत्येक दिवशी क्रीडा, कला, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी सैनिक संघटना, पेन्शनर्स बहुउद्देशीय संघटना , सर्पमित्र तसेच अपास या वन्यजीव संघटनेचा ,तालुक्यातील पत्रकारांचा ,प्राविण्य प्राप्त खेळाडू, दिशा एज्यु पॉईंट येथील गुणवंत मुली, सांस्कृतिक कार्यक्रमात अव्वल स्थान मिळविलेल्या मुली, बचत गट व महिला उद्योजक , 24 तास सेवा ग्रुप महिला ,सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षक श्री चव्हाण यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

      खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सह करण देवतळे ,रवी शिंदे, देवराव भोंगळे, रमेश राजुरकर , अहेतेशाम अली,  विलास टिपले ,अनिल झोटिंग, वैभव डहाणे ,राजू चिकटे, , आसिफ रजा आदींनी उत्सवाला भेटी दिल्या. संवर्ग विकास अधिकारी संदीप गोडसेलवार आणि तहसीलदार रोशन मकवाने यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे या उत्सवाचे 22 हजार तिकिटे मुलांना विनामूल्य देण्यात आली होती. 

          या उत्सवाच्या आयोजनातून गोळा झालेला निधी विविध समाजउपयोगी कार्यात खर्च करणार असल्याचे रोटरी च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग पत्तीवार ,सचिव अदनान सिद्दीकोट, कोषाध्यक्ष योगेश डोंगरवार, समिर बारई,दादा जयस्वाल, होजफा अली,हिरालाल बघेले, डॉ सागर वझे, डॉ  जोगी, राहुल पावडे, मनोज कोहळे, रवी शिंदे,शब्बीर बोहरा,विनोद जानवे प्रितेश जैन, आकाश गाहूकर आदींनी उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले

फोटो..

Post a Comment

0 Comments