राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलनात लोकमान्य विद्यालयाचे सुयश

राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलनात लोकमान्य विद्यालयाचे सुयश



वरोरा (प्रती)नुकतेच  ठाणे येथे पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या उपस्थितीत दिलीप हेगडेकर आणि डॉ. सोमण यांच्या हस्ते पार पडलेल्या संमेलनात राज्यात शालेय गटात लोकमान्य विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ भोयर याचा संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक तर लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वृषभ सुरेंद्र एकरे आणि आदित्य अमोल थेरे यांना द्वितीय राज्यातून द्वितीय क्रमांक प्रदान करण्यात आला
         
         मराठी विज्ञान परिषद अंतर्गत आयोजित १०वे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन नुकतेच  ठाणे येथे पार पडले. मराठी विज्ञान परिषद, ठाणे तर्फे १०वे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलनामध्ये सहभागी विद्यार्थांचे सादरीकरण करण्यात आले. या   मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या काण्याकोपऱ्यातून शंभरहून अधिक विज्ञानाशी निगडीत दिलेल्या विषयावर प्रकल्प विद्यार्थांनी सादर केले होते.
             विशेष म्हणजे लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सलग तिसऱ्यांदा  राज्यस्तरावर पोहचवले आहेत. हे राज्यस्तरीय बाल विज्ञान संमेलन दर तीन वर्षांतून एकदा होत असून, सलग तीनही वार्षिक सत्रात लोक शिक्षण संस्थेच्या विद्यार्थांनी संस्थेचे नाव राज्यस्तरावर पोहचवून लौकिक प्राप्त केला आहे.

या संमेलनात 'वस्त्र' या प्रकल्पाचे सादरीकरण वृषभ सुरेंद्र भोयर  ,  आणि आदित्य अमोल थेरे , वर्ग ११ वी विज्ञान यांनी सादर केले. 
वृषभ आणि आदित्य या दोघांच्या वस्त्र या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक व ३०००/- रुपये रॉकग पुरस्कार प्राप्त झाला. तसेच पार्थ भोयर याला त्याच्या मॉडेल साठी राज्यातून पहिला क्रमांक मिळाला. पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी व इतर वैज्ञानिकांच्या हस्ते यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
                  विद्यार्थांनी याचे श्रेय  आई - वडील आणि शिक्षकांना दिले आहे. या विद्यार्थ्यांना लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आनंद मेहता आणि भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख निलेश मजगवळी तसेच विज्ञान शाखेच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह प्रा विश्वनाथ जोशी, एडवोकेट दुष्यंत देशपांडे प्राचार्य दीपक नवले आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments