जिल्हास्तरीय स्पर्धेत अंध विद्यालयाची सलग पंधराव्या वर्षी हँट्रीक

जिल्हास्तरीय स्पर्धेत अंध विद्यालयाची सलग पंधराव्या वर्षी हँट्रीक


आनंदवनातील विद्यार्थ्यांनी अखेर रचला महाविक्रम
     




 वरोरा(प्रती)   दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा आयोजित जिल्हा स्तरावरील 'दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत' सलग पंधराव्या वर्षी हँट्रीक साधत आनंद अंध विद्यालय, आनंदवनाच्या अंध विद्यार्थ्यांनी यश पटकावले.
   जिल्ह्यातील दिव्यांगांच्या एकूण सोळा शाळा यात सहभागी झाल्या होत्या. त्यात मंतीमंद प्रवर्ग, आस्थीव्यंग प्रवर्ग, कर्णबधिर प्रवर्ग व अंध प्रवर्गातील विविध स्पर्धा पार पडल्यात यामध्ये अंध विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विजयाची परंपरा सतत पंधरा वर्षे कायम ठेवली हे विषेश. गोळाफेक, लांबऊडी, बुध्दीबळ, पाँसिंग द बाँल, २५ मिटर, ५० मिटर व १०० मिटर धावणे इत्यादी विविध स्पर्धांमध्ये मोहित धोटे, सुनंदा टेकाम, अंतरा पिपरे,आस्था जगताप, तन्वी गोरडे, स्नेहल इददे् , छकुली राठोड, युगांत करकाडे,अनिकेत घोसले,प्रशीक मेश्राम या सर्व अंध विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकासह १६ सुवर्ण पदके व २५ रजत पदके पटकावलीत तसेच सायंकाळच्या सांस्कृतिक सामुहिक नृत्य स्पर्धेत अंध प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून पहिल्याच स्थानावरचे प्रथम पारितोषिक पटकावले. या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हा परिषद चंद्रपुरचे मुख्य कार्यपालन अधिकारी मा. श्री. विवेक जाँन्सन (भाप्रसे) मा. श्रीमती वर्षा गौरकार अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प.चंद्रपूर, मा. श्री. विजय वाकुलकर, उपायुक्त जाती पडताळणी समिती, चंद्रपूर, मा.श्री. दिपेंद्र लोखंडे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. चंद्रपूर,मा. श्री.संग्राम शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मा. श्री. सुरेश पेंदाम जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर या सर्व प्रमुख अतिथींच्या हस्ते आनंद अंंध विद्यार्थ्यांच्या चमुला पदके व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी परमानंद तिराणिक कलाशिक्षक, जेष्ठ शिक्षिका साधना माटे, विलास कावणपुरे,वर्षा उईके, राकेश आत्राम व तनुजा सव्वाशेरे इत्यादी शिक्षक मंडळींनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देवून त्यांना जिल्हास्तरावर नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर यांनी समाधान व्यक्त केले. या शिक्षकवृंदाच्या अथक परिश्रमाबद्धल महारोगी सेवा समिती संस्थेचे सचिव मा. डाँ. विकासभाऊ आमटे, डाँ. भारतीवहीनी आमटे, मा. कौस्तुभ दादा आमटे, पल्लवी आमटे, डाँ. विजय पोळ, संस्थेचे विश्वस्त मा. श्री. सुधाकरजी कडू गुरूजी मा. श्री. कविश्वर काका यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले..

Post a Comment

0 Comments