नगरच्या भूमीत आनंदवनच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा डंका

नगरच्या भूमीत आनंदवनच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा डंका

६ विद्यार्थ्यांनी पटकाविले ११ पदक




'मिशन पॅरा ऑलंपिक'अनाम प्रेम संस्था आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा 

 वरोरा(प्रती) अहमदनगर येथे दि. ४ व ५ जाने. २०२३ लाआयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत आनंदवनातील ६ कर्णबधिर विद्यार्थी सहभागी झाले. विविध क्रीडा स्पर्धेत या ६ विद्यार्थ्यांनी ११ पदके प्राप्त केली.
 पदकांचे विवरण खालील प्रमाणे :- 
१) देवेंद्र हटवार (वयोगट १३ ते १७) २०० मी. धावणे - प्रथम, लांब उडी - द्वितीय.
२) आयुष चेंनुरवार (वयोगट १३ ते १७) लांब उडी - प्रथम, देवेंद्र हटवार - द्वितीय. 
३) साहिल धानफोले (वयोगट १३ ते १७) लांब उडी - तृतीय. 
४) अमोल पवार (वयोगट १८ ते ३०) लांब उडी - प्रथम, २०० मी. धावणे - द्वितीय. 
५) रुपेश गजभे ( वयोगट १८ ते ३०) लांब उडी - द्वितीय, २०० मी. धावणे - तृतीय. 
तसेच वेळेवर दिलेल्या विषयावर (दिव्यांगत्व) रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात आयुष चेंनुरवार - प्रथम व अमोल पवार याने तृतीय क्रमांक पटकाविले.
सदर कार्यक्रमाला मा. राजश्री पाटिल (व्हीलचेअर युझर - युवा उद्दोजिका) मा. नेहा पावसकर (आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिंपिक क्रिकेट व फुटबॉल खेडाळू,), मा. निर्मल थोरात ( शिव छत्रपती पुरस्कार विजेते) उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments