सामान्यपर्यंतही ब्रेल लिपीचे अभियान पोहचवा - सुधाकर कडू

सामान्यपर्यंतही ब्रेल लिपीचे अभियान पोहचवा - सुधाकर कडू

आनंद अंध विद्यालयात लुईस ब्रेल जयंती साजरी
 


वरोरा(प्रती) आपण अनेक थोर पुरूषांच्या जयंती व पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. पण त्या महापुरुषांचा इतिहास इतर सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचत नाही. अंधांना वाचनाच माध्यम ठरलेल्या लुईस ब्रेल यांची लिपी स्पर्धेच्या युगात लुप्त होते की काय? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. फक्त आणि फक्त अंध व्यक्तीनांच या ब्रेल लिपी बद्दल माहिती आहे. या लिपिचा पाहिजे तसा प्रसार शासन स्तरावर व समाजापर्यंत अजूनही पोहचला गेला नाही. भारतीय संविधानानुसार सर्वांना शिक्षणाच्या समान संधीचा अधिकार आहे. पण दृष्टीबाधित अंध विद्यार्थ्यांची ब्रेल लिपी हे सर्वसामान्य पर्यंत न पोहचविल्या गेल्याने जेव्हा अंध विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्यात न्युनगंड निर्माण होऊ शकतो. अंधांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो, अडचणी येवू नये म्हणून ब्रेल लिपी जनजागरण अभियान प्रत्येक सामान्य शाळेत व महाविद्यालयात राबविल्या गेल्यास हे अंध विद्यार्थी नक्कीच तेवढ्या आत्मविश्वासाने स्वावलंबी बनतील असे प्रतिपादन महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी केले.
आनंद अंध विद्यालय, आनंदवनात 'लुईस ब्रेल जयंती' मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी ते बोलत होते. ब्रेल लिपिचे जनक, कर्णबधीरांचे प्रेरणास्थान डाँ.हेलन केलर व आनंदवन निर्मितीचे शिल्पकार 'श्रध्देय बाबा आमटे' व साधनाताई यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आनंदवन ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली दरेकर यांनी उद् घाटन केले. अंध मुलांनी या दिवशी 'स्वयंशासन' हा उपक्रम राबविला, प्रत्येक अंध विद्यार्थ्यांने स्वत:ची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, संधीनिकेतन अपंगांची कार्यशाळेचे अधिक्षक रविंद्र नलगिंटवार, मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भसारकर, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक सेवक बांगडकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक राकेश आत्राम तेलंग व अंध विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली. त्यात त्यानी लुईस ब्रेल यांच्या जीवनावर आधारित स्वरबद्ध केलेले गीत गायले. ब्रेले लेखनवाचन, स्पर्धा, फुगे फुगविने व फुगे फोडने स्पर्धा, एकावर एक रचलेले ग्लाँस चेंडूने पाडणे स्पर्धा, सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा  स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.

उपस्थित मान्यवर व प्रमुख अतिथींना यावेळी परमानंद तिराणिक यांनी स्वत:  हस्तलिखित केलेली संविधानाच्या उद्देशिकेची पोस्टकार्ड साईजची प्रत व कागदीपुष्प भेट देण्यात आली. प्रास्ताविक सेवक बांगडकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे संचालन कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी केले तर आभार प्रदर्शन तनुजा सव्वाशेरे यांनी केले. या कार्यक्रम आयोजनाच्या क्रिडा समिती प्रमुख हस्तकला शिक्षिका साधना ठक, जेष्ठ विशेष शिक्षिक कृष्णा डोंगरवार, तंत्रस्नेही शिक्षक विलास कावणपुरे, वर्षा ऊईके, चेतन चिंचोलकर, रविंद्र चूदरी, सतवन सरीयाम, लिला कोंद इत्यादी शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments