आनंद अंध विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी


आनंद अंध विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती साजरी
  
           

वरोरा (प्रती) युवकांचे प्रेरणास्थान, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशन, वरोरा चे अध्यक्ष जितेश कायरकर व उपाध्यक्ष शुभम दौलतकर यांनी आनंद अंध विद्यालय, आनंदवनला "स्वामी विवेकानंद यांचे तैलचित्राची प्रतिमा भेट देऊन त्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
         विवेकानंदांनी आयुष्यभर युवकांना बलवान व सामर्थ्यवान होण्यासाठी जागृती केली. शरीराबरोबरच मनाचेही सामर्थ्य त्यांना अभिप्रेत आहे मनाच्या सामर्थ्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच एकाग्रता साधने म्हणजे मनशांती सहज साध्य होते असे परमानंद तिराणिक म्हणाले.
                यावेळी नेहरू युवा केंद्र आपत्ती व्यवस्थापनचे समन्वयक नाझीर कुरेशी, राजीव गांधी इंजिनिअरिंग काँलेजची सहाय्यक प्राध्यापिका अंजुमन कुरेशी, कृष्णा डोंगरवार, परमानंद तिराणिक, तनुजा सव्वाशेरे, वर्षा ऊईके व राकेश आत्राम, यांनी स्वामी विवेकानंद यांच्या  प्रतिमेला पुष्प वाहिले यानंतर स्वामी विवेकानंद युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेश कायरकर व उपाध्यक्ष शुभम दौलतकर यांचे हस्ते अंध मुलांना मिठाई देण्यात आली. सर्व युथ फाऊंडेशनचे सदस्य व शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments