पुरोगामी पत्रकार संघाचे विभागीय संमेलन २६ जानेवारीला

पुरोगामी पत्रकार संघाचे विभागीय संमेलन २६ जानेवारीला





बल्लारपूर(प्रती)राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघांचे विभागीय पत्रकार स्म्मेलन दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी बल्लाळशाह नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दुपारी १ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
       राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक  अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात तहसीलदार् डॉ.स्नेहल रहाटे, 
काँग्रेस चे बल्लारपूर शहर अध्यक्ष
 करीमभाई,संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे,विदर्भ कायदेशीर सल्लागार एड. राजेश सिंग,जिल्हा अध्यक्ष सुजय वाघमारे,जिल्हा कार्याध्यक्ष राकेश  सोमाणी यांची उपस्थिती राहील.
          दुपारी २:०० वाजता
"कराओके गीत गायन स्पर्धा" 
 सुनिल शिरसाट यांच्या संयोजनाखाली आयोजित केली आहे.दुपारी ३:३० वाजता विविध क्षेत्रातील  मान्यवरांचा सत्कार समरोह तर दुपारी ४:०० वाजता "वर्तमान भारतीय राजकारण आणि पत्रकारिता" या विषयावरील परीसंवादात एड.योगिता रायपुरे हे आपले मत मांडणार आहेत.
दुपारी ४:३० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव समारंभ आयोजित केला असून,
सायंकाळी ५:०० वाजता
आशु वनकर यांच्या संयोजनाखाली स्थानिक बचत गट महिलांची 'पारंपारिक नृत्य स्पर्धा,आयोजित केली आहे.
तर सायं. ६:०० "पुरोगामी महापुरुषांचे विचारच भारतीय लोकशाही आणि स्वातंत्र्याला तारू शकतात." या विषयावर परीसंवाद आयोजित केला आहे.
 डॉ. अभिलाषा गावतुरे या विषयावर मार्गदर्शन करतील.
        सायं.७:०० वाजता  मृणाल कांबळे यांच्या अध्यक्षतेत निमंत्रित कवीचे "पुरोगामी कवी संमेलन" आयोजित करण्यात आले असून,या कवी सम्मेलनाचे सूत्र संचालन एड. योगिता रायपुरे  करतील.
           रात्री ८: ०० वाजता मुख्य गौरव समारंभ होणार आहे. यात  डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या सामाजिक योगदाना बद्दल "राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार-२०२३" तर एड. योगिता रायपुरे यांना त्यांच्या शैक्षणिक योगदाना बद्दल "क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार-२०२३", पत्रकार लिमेश जंगम यांना त्यांच्या निर्भीड पत्रकारिते बाबत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार गौरव पुरस्कार-२०२३" प्रदान करण्यात  येणार आहे.
      सायं. ८:३० वाजता स्पर्धचे पारितोषिक वितरण होणार असून,सायं. ९:०० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षीय भाषणा नंतर सामूहिक राष्ट्रगीतानेकार्यक्रमाचा समारोप होईल.
        या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष  नरेंद्र सोनारकर, जिल्हा अध्यक्ष सुजय वाघमारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments