योग साधना आणि सूर्यनमस्कार ही प्राचीन भारताची ओळख आहे-- अहेतेश्याम अली

योग साधना आणि सूर्यनमस्कार ही प्राचीन भारताची ओळख आहे-- अहेतेश्याम अली


७०० विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्कार अविष्कार


वरोरा (प्रति) आज आमची जीवन पद्धती बदलली असून दैनंदिन व्यवहार अतिशय धावपळीचे झालेले आहेत. अशावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून नवनवीन आजार डोके वर काढत आहे. त्यामुळे सुदृढ शरीर स्वास्था करता आणि मनाच्या एकाग्रतेकरिता दैनंदिन सूर्यनमस्कार घालावे. कारण सूर्यनमस्कार आणि योग साधना हे प्राचीन भारताची संस्कृती असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अहतेश्याम अली यांनी केले . लोकशिक्षण संस्थाद्वारा संचालित योग भारतीच्या वतीने रथसप्तमीचे औचित्य साधून सामूहिक सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन शनिवारला करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते


      यावेळी व्यासपीठावर लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील यांची उपस्थिती होती. आपल्या मनोगतात अली यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाकडे लक्ष द्यावे असे सांगत, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे लक्ष दिल्यास त्यांच्यात नैराश्य येत नाही. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगावी आणि परिश्रमाच्या माध्यमातून यश संपादन करावे असे ते म्हणाले.

         प्राध्यापक श्रीकांत पाटील यांनी योग साधक हे सूर्याचे किरण पोचविणारे सूर्याचे दूत असतात असे सांगत, युवक हे ऊर्जेचे प्रतीक आहे असे ते म्हणाले. ऊर्जेच्या भरोशावर ही सृष्टी असून सूर्यदेवता कर्मयोगी आहे. कारण ती नियमीत प्रकाश देत राहते. आज मोबाईल संस्कृतीमुळे विद्यार्थ्यांचे जागरण वाढले. त्यामुळे त्यांना सूर्याचे दर्शन सकाळी होत नाही. त्याकरिता विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराची सवय लावावी म्हणजे ते सकाळी नियमित उठतील आणि शरीर स्वास्थ उत्तम राहील. सूर्यनमस्कार हे आमचे प्राचीन सौंदर्यपूर्ण संस्कार आहे असेही प्रा पाटील याप्रसंगी म्हणाले


        सूर्यनमस्कार यज्ञाची सुरुवात कालभैरवाष्टकम या स्वागत स्तोत्राने झाली तर सांगता श्री सूर्यमंडलम स्तोत्राने केली. लोकशिक्षण संस्थेच्या सातशे विद्यार्थ्यांनी सामूहिक योग प्रात्यक्षिकातून अर्धकृती सूर्य प्रतिमा साकारली तेव्हा उपस्थितांनी त्यांना टाळ्यांनि दाद दिली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खुर्चीवरील असणे याप्रसंगी सादर केली. संस्थेतील भाषा भारती, योग भारती, संस्कृत भारती, विज्ञान भारती, क्रीडा भारती आणि विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजल डाखरे, प्रास्ताविक श्रुती पाटेकर तर आभार साक्षी खंडारकर यांनी मानले




Post a Comment

0 Comments