तब्बल 34 वर्षानंतर भरला मित्रांचा मेळावा


  तब्बल 34 वर्षानंतर भरला मित्रांचा मेळावा



 वरोरा (प्रती )धकाधकीच्या जीवनातून स्वतःकरता वेळ काढणे आणि 35 वर्षांपूर्वी एकाच बाकावर बसलेल्या मित्रांचा आठव होणे.. पन्नाशीत पोहोचल्यावर त्या सर्व आठवणींना गोंजरणे म्हणजे माघ महिन्यात वाढीस लागलेल्या उन्हात वसंत वैभवाची पार्श्वभूमीच होय. असाच काहीसा प्रसंग वर्धा येथून न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये 1988 मध्ये मॅट्रिक पास झालेल्या मित्रमैत्रिणींनी नुकताच अनुभवला
       तंत्रज्ञानाच्या युगात व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण या सर्व मित्रमैत्रिणींना एका धाग्यात जोडू शकतो ही कल्पना पद्माकर हिवंज आणि रणजीत इंगोले यांच्या मनात डोकावली आणि सर्वांनी मिळून हे आव्हान स्वीकारले. साधारणतः  महिनाभरापासून संपर्काला आरंभ झाला आणि एक-एक करता 75 विविध क्षेत्रात काम करणारे सारस्वत जोडले गेले. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि राज्याच्या विविध ठिकाणाहून आलेल्यांची ही स्वारी पेंच येथील निसर्गरम्य हिरवळीत विसावली.
                 पहिल्या दिवशी काहीशे फुगलेले तर थोडे विरलेले, डोक्यावरचे केस आणि पांढऱ्या केसांमधून पन्नाशी ची चाहूल देणाऱ्या मित्रांच्या भेटी होताच , प्रत्येकाला हा जणू सोनियाचा दिनू च वाटला. संध्याकाळी आयोजित संगीत रजनी मध्ये एकापेक्षा एक सुरेल गाण्यांची मैफल रंगली. हिंदी- मराठी गीतांचा हा नजराना प्रत्येकाला सुखावून गेला. मागील तीन दशकात जीवनाचा डाव अर्ध्यावर सोडून गेलेल्या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारती भांडे, पूजा फाळके ,मीनल बेडेकर ,रणजीत इंगोले, राजेश पाटील, प्रवीण चौधरी,संदिप राऊत,किशोर भंडोपिया , नरेश ढवळे, अजय जानवे, नरेंद्र देवडे, जयंत गावंडे  यांनी एकापेक्षा एक सुरेल गाणे या मैफिलीत गायली. मित्रांच्या स्वभावाचे अचूक आकलन करणारे दिनेश खमेले  याचे वार्तापत्र मैफलीत भाव खाऊन गेले. सूत्रसंचालन प्रशांत खुळे याने केले. 'आई' या सेवा समूहाच्या उपक्रमांचा आणि मनोज अडचुले, अजय जानवे, किशाेर ऊमाठे, सविता बाडबुचे  करत असलेल्या रुग्णसेवेचा परिचय यावेळी सर्वांना झाला.
        दुसऱ्या दिवशी वय आणि पद विसरून सर्व पाण्यात हुंदडायला लागले. तोच निरागसपणा आणि साळसूदपना यावेळी जाणवला. त्यानंतर खिंडसी कडे झालेले प्रयाण झाले. तेथील बोटिंग चा आनंद कायम मनावर कोरून गेला.  परतीच्या प्रवासात बसच्या काचा हलतील इतक्या वरच्या टीपेला जाऊन गायलेले गाणे आणि नृत्याने या गेट-टुगेदर  ला रंगत आली.
       या आयोजनाचे शिलेदार पद्माकर हिवंज, रणजीत इंगोले, किशोर उमाटे, मोना तिवारी, शाम लंगडे, स्वाती कापडे, क्षमा मुधोळकर,मनोज अडचुले, संदेश किटे, अजय जानवे, राजेंद्र वाघमारे आदींच्या अथक परिश्रमाचे ते फलित होते.


Post a Comment

0 Comments