छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तरुणांनी आत्मसात केल्यास दुसरी क्रांती

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तरुणांनी आत्मसात केल्यास दुसरी क्रांती 


शिव व्याख्याता कु. साक्षी पवार यांचे खडकी च्या सभेत प्रतिपादन.                                



अकोला (प्रती )स्थानिक धाबेकर नगर श्रद्धा कॉलनी नंबर 2 खडकी बु. अकोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त शिवव्याख्याता कुमारी साक्षी पवार हिच्या व्याख्यानाचे आयोजन राजमुद्रा ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते .या व्याख्यानाला मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास या निमित्ताने जागा झाला होता .छत्रपतींचे मॅनेजमेंट, अंधश्रद्धा निर्मूलन विषयी कार्य, शेतकऱ्यांविषयी चे कार्य, सर्व जाती-धर्मांच्या मावळ्यांना घेऊन रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष या  व्याख्याना निमित्ताने साक्षी पवार यांनी प्रत्यक्ष उभा केला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी तरुण युवक युवतीने छत्रपतींचे विचार नुसतं जयंती पुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विचार जर आचरणात आणले तर देशामध्ये एक दुसरी क्रांती निर्माण होऊ शकते एवढी ताकद त्यांच्या विचारांमध्ये असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याता कुमारी साक्षी पवार हीणे संबोधताना केले.
. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जन आंदोलन चे गजानन हरणे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये जि प सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, मा.पंचायत समिती उपसभापती गणेश अंधारे, समाजसेवक शंकरराव लंगोटे, राजेश घोगरे, वैकुंठा ढोरे, सुरज अंधारे, युवा पत्रकार आशिष गावंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा राऊत यांनी तर संचालन कुमारी वैष्णवी राठोड व आभार अमोल भटकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच शिवव्याख्याता कू साक्षी पवार यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .तसेच फटाक्याच्या आतिषबाजीने हा उत्सव तरुणांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला खडकी परिसरातील युवक    युवती महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राजमुद्रा ग्रुपचे पदाधिकारी शंतनु     मानतकर , रोशन फाळके, तन्मय हरणे, रोहित शिंदे, नरेश चव्हाण, ईश्वर पाठक, सोनू बेलगे, हर्षल गिरे, यश गिरी, अथर्व घोगरे, गौरव घायवट, अभी मुंडे, गजदीप जळमकर, अक्षय भांगे, आकाश शिरोडकर, प्रतीक कुचर, गणेश अग्रवाल आदींनी अथग परिश्रम घेतले  .                                    

Post a Comment

0 Comments