धम्म भाषा प्रचार-प्रसार ही एक चळवळ व्हावी- पी.एम. डांगे

वरोरा येथे पालि भाषा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न
धम्म भाषा प्रचार-प्रसार ही एक चळवळ व्हावी- पी.एम. डांगे 



वरोरा (प्रती )दि. 25/02/2023 ला वरोरा येथील महास्थविर शिवली बुद्ध विहार टिळक वार्ड, वरोरा येथे पालि भाषा परीक्षा क्रमांक 1,2,3 व 4 उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा  समारोह आयोजित करण्यात आला. ही परीक्षा दि. 18 डिसेंबर 2022 रोजी जेतवन बुद्ध विहार, काॅलरी वार्ड व महास्थविर शिवली बुद्ध विहार टिळक वार्ड, वरोरा येथे घेण्यात आली होती. या दोन्ही केंद्रावर एकूण 53 परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली व सर्वच पास झाले. काहींना जिल्हा स्तरावर स्थान प्राप्त केले तर आयु. मालाताई झोडापे यांनी परीक्षा क्रमांक 1 मध्ये महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक पटकावून वरोरा शहराची मान उंचावली. 
    या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाची सुरवात भगवान गौतम बुद्ध व  परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून बुद्धवंदनेने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धम्ममित्र आयु.पी.एम.डांगे साहेब यांनी भूषविले. या कार्यक्रमाला महास्थविर शिवली बुद्ध विहाराच्या अध्यक्षा आयु. शीलताई ढोकणे, जेतवन बुद्ध विहाराच्या अध्यक्षा व त्या केंद्राच्या केंद्रप्रमुख आयु. रेखाताई तेलतुंबडे, आयु. विजय धोपटे प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी दोन्ही केंद्राचे परीक्षा नियंत्रक म्हणून काम सांभाळणारे आयु.विजय भसारकर व परीक्षेच्या यशस्वीतेसाठी धडपडणारे आयु. आनंदराव जांभूळकर यांनी आपापले मनोगत व्यक्त केले व पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली. या प्रसंगी काही परीक्षार्थ्यांनी  आपल्या भावना व्यक्त केल्या. 
     “ पालि भाषा ही बुद्ध कालीन समृद्ध भाषा असून अवगत भाषेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसोबतच पाली भाषेची सुद्धा नोंद करावी ” असे आवाह्न अध्यक्षीय भाषणात आयु.डांगे साहेब यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शिवली बुद्ध विहार परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम पहाणारे धम्म उपासक आयु. राहूल कळसकर यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र वितरीत करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments