बल्लारपूर येथे समता पर्वाला सुरूवात.

बल्लारपूर येथे समता पर्वाला सुरूवात



चंद्रपूर (प्रती )महाराष्ट्र शासनाच्या "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था" बार्टी (BARTI) या स्वायत्त संस्थेमार्फत, तालुका समतादूत कु.अस्मीता वनकर यांच्या वतिने जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा,विसापूर, तालूका - बल्लारपूर.येथून समता पर्वाची सुरूवात करण्यात आली.पाहुण्यांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाची सुरूवात  क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व अभीवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. धनराज दुर्गे ( मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे पंचशीला मांडवे (शिक्षीका) व इतर सहकारी शिक्षक उपस्थीत होते.कार्यक्रमात  विद्यार्थांना मार्गदर्शन,तथा त्यांच्याकरीता विवीध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले,   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे परीचर श्री. बालूभाऊ यांनी विशेष परिश्रम घेतले,तसेच सर्व विद्यार्थी,शिक्षकवृंद यांनीही आपले मौल्यवान योगदान दिले.

Post a Comment

0 Comments