स्व. अरुण आखतकर उत्तम संघटक --डॉ. अनिल बुजोणे

स्व. अरुण आखतकर उत्तम संघटक --डॉ. अनिल बुजोणे
 
        
स्व आखतकर यांना वाहिली आदरांजली 
      वरोरा (प्रती ) स्वर्गीय अरुण आखतकर हे एक उत्तम संघटक होते. तरुण वयापासून त्यांनी हिंदुत्वाचा विचार स्वीकारून तो पुढे नेला. मीतभाषी आणि सर्वांना घेऊन चालणारे अशी त्यांची ख्याती होती. वरोरा शहरात नवनवीन उपक्रमांना त्यांनी चालना दिली त्यामुळेच ते जनमानसात लोकप्रिय होते असे प्रतिपादन डॉक्टर अनिल बुजोणे यांनी केले
       सामाजिक कार्यकर्ते स्व अरुण आखतकर यांच्या प्रथम स्मृतीदिनी विनायक मंदिर देवस्थान येथे आयोजित आदरांजली सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, विनायक मंदिर देवस्थानचे सचिव गजानन शेळके, माजी प्राचार्य हजारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर भगवान गायकवाड आणि अविनाश महाराज उपस्थित होते
       आपले विचार व्यक्त करताना अविनाश महाराज म्हणाले की स्वर्गीय अरुणा आखतकर यांनी हे नियमित पंढरीच्या वारीला यायचे. माणसं जोडणारा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. भागवत सप्ताह चे आयोजन त्यांच्या पुढाकाराने च होत होते असेही ते म्हणाले. डॉक्टर गायकवाड यांनी स्वर्गीय अरुण आखतकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या संघटन कौशल्याची स्तुती केली, तर सुधाकर कडू यांनी अरुण आखतकर यांचे आनंदवनाशी असलेले नाते अधोरेखित करत त्यांच्या सामाजिक योगदाना ची आठवण करून दिली. गजानन शेळके आणि प्रशांत खुळे यांनीही आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या 
     संचालन विलास कावलकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता मौन श्रद्धांजली ने झाली 
 

Post a Comment

0 Comments