पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद






वरोरा (प्रती)
     चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज 30 जुलै रोज रविवारला वरोडा येथे भाजपा व सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातर्फे आयोजित महारक्तदान शिबिरात 205 रक्तदात्यांनी आपल्या रक्ताचे दान केले. रक्तदात्यांची गर्दी प्रचंड होती. रक्त संकलित करणाऱ्या पिशव्या संपल्यामुळे अनेक रक्तदात्यांना निराश होऊन परत जावे लागले.वरोड्यात प्रथमच रक्तदान शिबीराला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला हे विशेष. 
               पालकमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त आज येथील आलिशान लाॅन मध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्त संकलित करण्यासाठी वर्धा येथील शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीची चमूचे सहकार्य लाभले. 
     हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपाचे वरोरा  जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या स्वत:चा आलीशान लॉन, वरोरा मध्ये रक्तदात्यांसाठी आणी आलेल्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.या प्रसंगी रक्तदान कार्यक्रमाचे शुभारंम्भ रमेश रजूरकर, अहेतेशाम अली, बाबासाहेब भागड़े, डॉ. भगवान गायकवाड,करण देवतळे,अंकुश आगलावे,सुरेश महाजन,राजू गायकवाड, शुभम चांभारे,राजू दोडके, विशाल पारखी,गजानन राऊत,अमित चवले,नींम्बाळकरताई,वंदना दाते,सुनीता ककड़े,कीर्ती कातोरे,सुषमा कराड,अमित आसेकर,जगदीश तोटावर,बाबू शेख,आकाश भागडे,संजू राम, राहुल बांदूरकर,अभय मडावी,कादर शेख, महेश कपाटे,सोबतच अनेक लोकांची या प्रसंगी उपस्थिति होती.

Post a Comment

0 Comments