भारत विद्यालय येथे शालेय मंत्रीमंडळाची स्थापना

चारगाव (खुर्द)


भारत विद्यालय येथे शालेय मंत्रीमंडळाची स्थापना 




वरोरा (प्रती)

वरोरा तालुक्यातील भारत विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चारगांव (खुर्द) येथे  ३१ जुलै २०२३  शालेय मंत्रीमंडळाची  स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत विद्यालय चारगाव (खुर्द )चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य  प्रितमदास सोनारकर तर प्रमुख पाहूणे म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक  विलास पारलेवार सर उपस्थित होते-

सर्वप्रथम प्रत्येक वर्गातून निवड झालेल्या नायक व उपनायक यांची एक सभा घेवून त्यामधून शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यात आले यामध्ये शालेय मुख्यमंत्री कू .नंदिनी किशोर बदकी तर उपमुख्यमंत्री म्हणून ओम विठ्ठल बावणे याची निवड करण्यात आली, क्रिडा मंत्री सागर मनाहेर पोहणकर तर सांस्कृतिक मंत्री कु .सौदर्या विनोद गेडाम हीची निवड करण्यात आली.

 शाळेच्या सर्व नविन मंत्रिमंडळातील सदस्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनारकर सर यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक - सोनारकर सर यांनी नविन मंत्रीमंडळाला शुभेच्या दिल्या व त्यांना मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मंत्रिमंडळाची रचना करतांना कशी तयारी करावी लागते याची प्रत्यक्षरित्या - निवडणूक घेवून त्यांची माहिती विदयार्थ्यांना समजावून दिली 

या कार्यक्रमाचे संचालन व आभार  सेवकराम आनंदे सर यांनी केले. कार्यक्रमाला सर्वशिक्षक. शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments