सुदृढ शरीरासाठी खेळ आवश्यक - आ प्रतिभा धानोरकर

सुदृढ शरीरासाठी खेळ आवश्यक - आ प्रतिभा धानोरकर

महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा
व्हालीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

  वरोरा (प्रती )
वरोरा हे शहर कबड्डी, वॉलीबॉल, आर्चरी खेळांकरिता नावारूपास आले असून ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनी राज्य स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत प्रतिनिधित्व केले आहे. सुदृढ शरीरासाठी खेळ आवश्यक असून आजच्या संगणकाच्या युगात मुलांचे खेळाकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे प्रतिपादन आ प्रतिभा धानोरकर यांनी केले. वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोरा व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा वरिष्ठ गट( पुरुष ) हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील,  महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील,  माजी नगराध्यक्ष आहतेश्याम अली, लोकशिक्षण संस्थेचे सचिव प्रा विश्वनाथ जोशी, शिवसेना (उभाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, प्राचार्य डॉ जयश्री शास्त्री, माजी नगरसेविका सुनीता काकडे,  एक्सलंट अकादमीचे संचालक अभय टोंगे, एड गजानन बोढाले, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते 
   यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या कि, मोबाईल आणि सांगणकाच्या युगात आजचा युवक हा खेळात मागे पडत आहे. प्रतीक पाटील यांनी व्हॉलीबॉल खेळाला प्रो कबड्डी चा दर्जा देणार असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. अहतेश्याम अली यांनी वरोऱ्याच्या खेळाची परंपरा सांगत खेळाडूंचे कौतुक केले. मुकेश जीवतोडे यांनी ग्रामीण भागात वॉलीबॉल खेळाचा प्रसार व्हावा करिता शासनाने मदत करावी असे सांगितले तर प्रा श्रीकांत पाटील याप्रसंगी म्हणाले की लोकशिक्षण संस्थेला व्हॉलीबॉल खेळाला 51 वर्षे पूर्ण झाले असून यापुढेही या खेळाला प्रोत्साहन दिले जाईल. तसेच शासनाने क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केल्यास अधिक क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील असेही ते म्हणाले.
     याप्रसंगी निवृत्त क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. लोकमान्य कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत,  प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. आष्टीडू -लाठीकाठी प्रात्यक्षिक आणि योग नृत्य याप्रसंगी सादर करण्यात आले. नितीन शास्त्रकार आणि अविनाश कांबळे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील 28 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून यातून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाणार आहे
    कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रशांत खुळे यांनी तर प्रास्ताविक वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन चे उपाध्यक्ष विनोद उंमरे यांनी केले.  वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांनी आभार मानले 

Post a Comment

0 Comments