डब्ल्यूएसएफ चषक राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचां पुणे विजेता तर अहमदनगर उपविजेता.

डब्ल्यूएसएफ चषक राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचां पुणे विजेता तर अहमदनगर उपविजेता.
 





वरोरा (प्रती)वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा,(डब्ल्यूएसएफ)व लोकशिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा व्हॉलीबॉल अजिंक्यपद पुरुष गटातील पुणे जिल्हा संघाने अहमदनगर जिल्हा संघावर चुरशीच्या लढतीत तीन 3-1 अशा सेटसनी पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. तर अहमदनगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय स्थानाकरीता झालेल्या सामन्यात गोंदिया जिल्हा संघाने अमरावती जिल्हा संघाचा पराभव करीत तृतीय स्थान फटकाविले. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुणे संघाचा साईराज बांदल ठरला.
       स्पर्धेचे बक्षीस वितरण लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील यांच्या हस्ते झाले तर यावेळी  महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख ,डॉ.विजय देवतळे, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी   नयोमी साटम, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी स्पर्धेला सदिच्छा भेट दिली
 स्पर्धेच्या दरम्यान पत्रकार बंधू व पंच ,पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वरोरा शहराचे माजी नगराध्यक्ष  विलास टिपले, राजेंद्र चिकटे, विलास  नेरकर, प्रा  विश्वनाथ जोशी, मुनाज शेख, नरेंद्र नेमाडे, डॉ हेमंत खापणे उपस्थित होते.
          स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खेळाडूंचा सत्कार सुवर्णरेखा पाटील यांच्या हस्ते झाला.  याप्रसंगी मंचावर करण देवतळे, अमोल मुथा, जयंत टेमुर्डे, समीर बारई, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर , संजय आंबुलकर, राहुलराखे,  सुनीता उरकांडे,  कल्पना देशपांडे उपस्थित होते
       स्पर्धा यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील व सचिव विरल शहा यांच्या मार्गदर्शनात वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडा यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments