वनविभागाने रेती सह ट्रॅक्टर घेतले ताब्यात

वनविभागाने रेती सह ट्रॅक्टर घेतले ताब्यात




वरोरा (प्रती)
वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या
 शेगाव कक्ष क्र. 550 मध्ये    वनकर्मचारी जि. एम. बोठे वनरक्षक शेगाव व रोजनदारी वनमजुर गस्त करीत असतांना आरोपी बाबाराव नारायण खाटीक, अंकुश शामराव मेश्राम, उमेश भावराव किन्नाके, परसराम देविदास शेडमाके, बंडू महादेव नन्नावरे व सुरज ज्ञानेश्वर मगरे सर्व रा. मेसा है ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CD 1540 व ट्रॉली क्रमांक MH-33-F-4385 ने राखीव वनातील कक्ष क्र. 550 च्या नाल्या मधुन अवैधरित्या रेतीची उत्खनन करतांना आढळून आले. करीता सदर रेती सहित ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेऊन  वनगुन्हा नोंद करुन वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे आणण्यात आले.

पुढील चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे, यांचे मार्गदर्शनात जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव व जि. एम. बोधे वनरक्षक शेगाव, चंदेल वनरक्षक मेसा करीत आहे.

Post a Comment

0 Comments