खेमजई येथे अतिप्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत नंदादीप गांव योजना शिवार फेरी सपन्न

खेमजई येथे अतिप्रभावीत मेगा पाणलोट प्रकल्प अंतर्गत नंदादीप गांव योजना शिवार फेरी सपन्न



वरोरा (प्रती )
दि. 8/3/2024 ला महात्मा गांधी रोजगार हमी योजना,अक्सिस बँक फॉउंडेशन,भारत रुरल लाईव्हलिहूड फाऊंडेशन द्वारा कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ता.वरोरा येथील खेमजई, महालगाव, वायगाव भोयर ग्रामपंचायत ह्या पंचायत समिती नंदादीप योजना साठी निवड झाली असून त्या अनुषंगाने, शिवार फेरी घेण्यात आली, शिवार फेरी दरम्यान गावाचा शिवार पाहण्यात आला असून त्यानुसार कामाची पाहणी करून कामे घेण्यात आली, सिचन विहीर,तलाव गाळ काढणे,शेततळे, नालाखोलिकरण,मजगी, या सारखी जलसंधारण ची कामे घेऊन गावाचा जल सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला व गांव च्या पाण्याची पातळी घेऊन सर्व गावकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून त्या कामामुळे गावातील पाण्याची पातळी कायम करणे व महात्मा गांधी रोजगार हमी योजना सफल करणे,या योजनेतुन लोकांना प्रत्येक हाताला रोजगार मिळून देणे व सीमांत कुटुंब यांचे उत्पन्न डबल करणे तसेच प्रत्येक शेतीला पाणी व प्रत्येक हाताला काम, सिंचन विहीर घेणे,या शिवार फेरीसाठी भटाळा ग्रामपंचायत  सरपंच मनीषा चौधरी,उपसरपंच  चंद्रहास मोरे,ग्रामसेवक मेघश्याम येचंलवार रोजगार सेवक रवींद्र रणदिवे,ग्रामपंचायत सदस्य रमेश चौधरी व गावकरी तसेच कृषी विकास चे टीम लीडर रोशन मानकर सर ,प्रबुद्ध डोये सर (कृषी तज्ञ),दीक्षांत राऊत सर (तालूका समन्वयक) श्रीपत पाटील सर (जलसंधारण तज्ञ ), मंगेश तुमसरे, विशाल आडे,गुरूदास चौधरी,अंकुश रामपुरे,आचल घोडमारे,पल्लवी नन्नावरे,नीलिमा वनकर, माया पोहीणकर सर्व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments