औषध निर्माण शास्त्राच्या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी दीनदयाल दारुंडे विदेशी रवाना

औषध निर्माण शास्त्राच्या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी दीनदयाल दारुंडे विदेशी रवाना


 सामान्य कुटुंबातील तरुणांची शैक्षणिक क्षेत्रात गरुड झेप 



वरोरा (प्रती)
बोर्डा येथील सेवानिवृत्त कर्मचारी कवी गौतम दारुंडे यांचे चिरंजीव दीनदयाल दारुंडे यांची मलेशिया, क्वाललंम्पुर येथील *युनिव्हर्सिटी ऑफ मलाया* या विद्यापीठात जेनेटिक या विषयात पी एच डी करण्यासाठी निवड झाली आहे ते या अभ्यासक्रमासाठी मलेशियाला नुकतेच रवाना झाले आहे,त्यांचा दोन ते अडीच वर्षाचा अभ्यासक्रम राहणार असून सदर विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीत 65 वा क्रमांक लागतो हे विशेष,मध्यमवर्गीय कुटुंबीयातून येत असलेल्या दीनदयाल यांचे प्राथमिक शिक्षण बोर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय वरोरा येथे झाले आहे,तर अमरावती येथील शासकीय औषध निर्माण महाविद्यालयातून त्यांनी एम फॉर्म हे शिक्षण पूर्ण केले आहे त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून त्यांच्यावर आप्तस्वकियांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,

Post a Comment

0 Comments