माझा विजय सुनिश्चित- आ. प्रतिभाताई धानोरकर

माझा विजय सुनिश्चित- आ. प्रतिभाताई धानोरकर



वरोरा (प्रती) लोकसभेची निवडणूक मी प्रथमतः लढवित जरी असली तरी याआधी मी अनेक निवडणुका  माझ्या नेतृत्वात लढविल्या आहेत. त्यामुळे आज जनमानसात जात असताना मिळत असलेला जनतेचा उत्स्फूर्त असा मोठा प्रतिसाद. आणि पाठीशी असलेला अनुभव यामुळे मला खात्री आहे की माझा विजय सुनिश्चित आहे असे मत इंडिया आघाडीच्या लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज दि.६एप्रिल रोजी वरोरा येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले
यावेळी विलास टिपले, राजु महाजन, राजु चिकटे, मिलींद भोयर, सलीम पटेल, राहील पटेल, चेतन शर्मा, अमर गोंडाने, निलेश भालेराव, गजानन मेश्राम, पुरूषोत्तम खिरटकर, रुपेश तेलंग असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यामध्ये खनिज निर्मिती ,कोळशाचे उत्पादन, वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून दुसरीकडे मात्र बेरोजगारांची  संख्या वाढत असताना दिसत आहे त्यामुळे या जिल्ह्यात मोठमोठे  उद्योगधंदे कसे आणता येतील व महिलांसाठी एखादा मोठा उद्योग कसा उभारता येणार याकडे लक्ष असून, चंद्रपूर- यवतमाळ या जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून शेतकऱ्यांच्या कापसाला कमालीचा भाव मिळावा म्हणून या जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क कसे आणता येईल याकडे प्रथमता लक्ष असून हे महत्वाचे मुद्दे घेउन मी ही निवडणूक लढत  असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments